'एसबीएल' कंपनीतील स्फोटातील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; बळीची संख्या २६

By सुमेध वाघमार | Updated: March 26, 2026 17:34 IST2026-03-26T17:33:14+5:302026-03-26T17:34:07+5:30

Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात जखमी होऊन उपचाराखाली असलेल्या आणखी एका महिला कामगाराचा आज गुरुवारी सकाळी मृत्यू झाला.

Another woman injured in SBL blast dies; death toll rises to 26 | 'एसबीएल' कंपनीतील स्फोटातील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; बळीची संख्या २६

Another woman injured in SBL blast dies; death toll rises to 26

सुमेध वाघमारे 
नागपूर:
काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात जखमी होऊन उपचाराखाली असलेल्या आणखी एका महिला कामगाराचा आज गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यूची संख्या एकूण २६ झाली असून आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८वर पोहचली आहे.

उषा बालाजी रेवतकर (वय ४३) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या शरीराचा ५० टक्के भाग भाजला होता. आज सकाळी ९:३५ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कंपनीत झालेल्या स्फोटानंतर एकूण १९ गंभीर रुग्णांना नागपूरच्या 'आॅरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट' मध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. यापैकी एका रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतांश रुग्णांना ३० टक्के ते ७५ टक्क्यांपर्यंत गंभीर स्वरूपाच्या 'मिक्सड थर्मल बर्न्स' (भाजल्याच्या जखमा) होत्या. याव्यतिरिक्त स्फोटातील छर्रे लागल्याने झालेल्या जखमा, कानाचे पडदे फाटल्याने आलेले बहिरेपणा आणि हाडांचे गंभीर फ्रॅक्चर अशा अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण होते.

Web Title : एसबीएल कंपनी विस्फोट: एक और घायल महिला की मौत; मृतकों की संख्या 26 पहुंची

Web Summary : राऊलगव स्थित एसबीएल कंपनी में विस्फोट में घायल एक और महिला की मौत हो गई। मृतकों की संख्या 26 हुई। वह 50% जल गई थी। विस्फोट के बाद उन्नीस लोगों को ऑरेंज सिटी अस्पताल में भर्ती कराया गया। अधिकांश मरीज गंभीर रूप से जले हुए थे।

Web Title : SBL Company Blast: Another Injured Woman Dies; Death Toll Reaches 26

Web Summary : Another woman injured in the SBL Company blast in Raulgav died. The death toll rises to 26. She had 50% burns. Nineteen were admitted to Orange City Hospital after the explosion. Most patients suffered severe burns and injuries.