पुन्हा एका २५ वर्षीय युवकाला गोवर, आरोग्य विभाग सतर्क
By सुमेध वाघमार | Updated: March 20, 2023 18:00 IST2023-03-20T17:59:20+5:302023-03-20T18:00:08+5:30
सदर रुग्ण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचाराखाली

पुन्हा एका २५ वर्षीय युवकाला गोवर, आरोग्य विभाग सतर्क
नागपूर : एकदा गोवर झाला की त्याची रोगप्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे प्रौढ वयात हा रोग सहसा दिसून येत नाही, असे असताना ७ मार्च रोजी एका ३० वर्षीय तर सोमवारी आणखी एका २५ वर्षीय युवकाला गोवर असल्याचे निदान झाले. महिन्याभरातील या दुसºया प्रकरणामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. हा रुग्णही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचाराखाली आहे.
मागील तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी ‘गोवर’ या विषाणूजन्य आजाराचा रुग्णांची संख्या वाढली आहे. नागपूर शहरात १ जानेवारी ते २० मार्च या दरम्यान ११५ संशयित रुग्ण आढळून आले. यातील १० वर्षांच्या आतील ४३ मुलांमध्ये गोवरचे निदान झाले. यामुळे आरोग्य विभागाने गोवर प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविला आहे. साधारण लहानपणी गोवर होऊन गेले असल्याने व प्रतिबंधक लस घेतल्याने प्रौढांमध्ये हा रोग क्विचीत दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.