शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

नागपुरात आणखी १८ पॉझिटिव्ह : एकाच दिवसात ५३ रुग्ण घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:47 PM

कोविड रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ५३ रुग्णांना सुटी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १९३ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ५३ रुग्णांना सुटी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब असलीतरी पुन्हा १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह कोरोनाबधितांची संख्या ३३६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, टिमकी भानखेडा येथून तब्बल १२ रुग्णांची नोंद झाली. यातील एक रुग्ण क्वारंटाईन नसल्याने व हंसापुरी या नव्या वसाहतीतूच चार रुग्णांचे निदान झाल्याने परिसरात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणाचा फायदा मेयो, मेडिकलला होऊ लागला आहे. गुरुवारी मेडिकलने २१ तर आज मेयोने ५३ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने हे दोन्ही रुग्णालय अर्धे रिकामे झाले आहे. येथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा भार काहिसा कमी झाला आहे. मेयोमधून सुटी देण्यात आलेल्या कोरोनामुक्तांमध्ये २१ पुरुष व ३२ महिला आहेत. यात मोमीनपुरा येथील १८ पुरुष तर २० महिला आहेत. सतरंजीपुरा येथील दोन पुरुष तर ११ महिला आहेत. या शिवाय मोठा ताजबाग येथील डॉक्टर महिला व जरीपटका येथील एक पुरुषाचा समावेश आहे. मेयोतून आतापर्यंत ११० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरात एकूण १९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.हंसापुरीत पहिल्यांदाच चार रुग्णांची नोंदमेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या टिमकी भानखेडा येथील ११ रुग्णांमध्ये २३,२६,२७, ३३,४२,४३,४५,५२,५३,५६ व ५९ वर्षीय सर्व पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण सिम्बॉयसीस येथे क्वारंटाईन होते. केवळ गोळीबार चौक टिमकी भानखेडा येथील २२ वर्षीय युवक गुरुवारी स्वत:हून मेयोत भरती झाला. त्याचाही नमुना पॉझिटिव्ह आल्याने या वसाहतीत आणखी रुग्ण असण्याची शक्यता आहे. नीरीच्या प्रयोगशाळेत चार पॉझिटिव्ह रुग्ण आले. हे सर्व रुग्ण हंसापुरी येथील आहेत. यात २१,३० व ५९ वर्षीय पुरुष तर ३०वर्षीय महिला आहे. हे सर्व रुग्ण व्हीएनआयटीमध्ये क्वारंटाईन होते. पहिल्यांदाच या वसाहतीतील रुग्णांची नोंद झाली. मोमीनपुरा येथून त्यांना लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेडिकलमध्ये काल रात्री सतरंजीपुरा येथील २०वर्षीय युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला तर आज सकाळी गड्डीगोदाम येथील ६५वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला. असे एकूण आज १८ रुग्णांची भर पडली.‘सारी’ रुग्णाचा मृत्यूपारडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला. ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चा रुग्ण म्हणून १४ मे रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. कोविड संशयित म्हणून नमुना तपासला असता तो निगेटिव्ह आला. या दोन महिन्यात मेडिकलमध्ये सारीचा हा दुसरा मृत्यू आहे. गड्डीगोदाम येथील ६५ वर्षीय सारीचा रुग्ण १३ मे पासून मेडिकलमध्ये उपचार घेत आहे. यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यांची प्रकृती गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज मेडिकलमध्ये ‘सारी’चे चार रुग्ण भरती झाले असून एकूण १२ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ८१दैनिक तपासणी नमुने ३३१दैनिक निगेटिव्ह नमुने ३१३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३३६नागपुरातील मृत्यू ०४डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १९३डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १९१९क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७६०पीडित-३३६-दुरुस्त-१९३-मृत्यू-०४

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर