संतापजनक! तरुणीचा अंघोळ करताना व्हिडिओ बनविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:19 IST2021-06-15T14:17:36+5:302021-06-15T14:19:18+5:30
Nagpur News अल्पवयीन आरोपीने शेजारची तरुणी अंघोळ करत असताना तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. या व्हिडीओतील फोटोचे स्क्रीन शॉट घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

संतापजनक! तरुणीचा अंघोळ करताना व्हिडिओ बनविला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन आरोपीने शेजारची तरुणी अंघोळ करत असताना तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. या व्हिडीओतील फोटोचे स्क्रीन शॉट घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. आरोपी १७ वर्षाचा आहे.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक २२ वर्षीय तरुणी सोमवारी सायंकाळी स्नान करत असताना आरोपीने तिचा लपून छपून व्हिडिओ बनविला. या व्हिडिओतील फोटोचे मोबाईल वर स्क्रीन शॉट घेऊन ते फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. हा संतापजनक प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या चुलत भावाने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी लगेच धावपळ करून आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता आरोपी १७ वर्षाचा अर्थात अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला सूचना पत्र देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.