शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाची क्लीन चिट नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:53 IST

Nagpur : नरखेड येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शंभर कोटी वसुली प्रकरणात चांदीवाल आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नाही. हे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या मुलाखतीवरून स्पष्ट झाले आहे. देशमुख क्लीन चिट मिळाल्याचे खोटे सांगत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काटोल मतदारसंघातील महायुतीचे (भाजप) उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ नरखेड येथे आयोजित सभेत फडणवीस यांनी देशमुख आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, चांदीवाल आयोग महाविकास आघाडी सरकारने स्थापन केला होता. आयोगाने अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला; परंतु त्यांनी तो अहवाल उघड केला नाही. इतकेच नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांनी बदलीसाठी ४० लाख रुपये घेतल्याचे पुरावे वाझे देत होता; परंतु कार्यक्षेत्रात येत नसल्याने तो पुरावा घेता आला नाही, असेही मुलाखतीत चांदीवाल यांनी सांगितले. 

गेल्या वीस वर्षांत काटोल नरखेडचा विकास झाला नाही. भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्याकडे विकास कसा करावा, निधी कसा मिळवावा याचे कसब आहे त्याकरिता मी स्वतः, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे ठाकूर यांच्या पाठीशी भक्कमपणे आहोत. या क्षेत्रात उद्योग, संत्रा प्रक्रिया केंद्राकरिता सबसिडी व आवश्यक ती मदत करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. कन्हान डायव्हर्शनला मंजुरी दिली असून, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर तालुक्याला त्याचा फायदा होईल. समृद्धी महामार्गामुळे उद्योग विदर्भात यायला लागले. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत असल्याचे म्हणाले.

सभेला काटोल मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी अविनाश ठाकरे, चरणसिंग ठाकूर, उकेश चौहान, दिनेश ठाकरे, नरेश अरसडे, समीर उमप, अजय बालपांडे, सतीश रेवतकर, रवी वैद्य, सुरेश खसारे यांच्यासह भाजप व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर