शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

...अन् तुकाराम मुंढे म्हणाले ‘ऑल इज वेल’ ‘सोशल मीडिया’वर समर्थन वाढीस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 04:10 IST

बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधील चिंता आणि रोष दोन्ही वाढीस लागले.

नागपूर : तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीच्या झाल्याच्या विरोधात नागपुरकरांमध्ये रोष वाढीस लागला आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या ‘सोशल मीडिया’वरील मोहिमेत मोठ्या प्रमाणावर तरुणाईदेखील जुळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ‘कोरोना’बाधित असलेल्या मुंढे यांनी ‘आॅल इज वेल’ असल्याची प्रतिक्रिया दिली आणि त्यांची काळजी करणाऱ्या समर्थकांना दिलासा मिळाला.बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधील चिंता आणि रोष दोन्ही वाढीस लागले.अखेर मुंढे यांनी स्वत: आपल्या प्रकृतीबाबत ‘सोशल मिडीया’वरुन माहिती दिली. मागील साडे पाच महिने ‘कोरोना’शी लढत असताना २४ आॅगस्ट रोजी माझी ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली. लक्षणे नसली तरी चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने शासनाच्या नियमावलीनुसार मी स्वत:ला गृह विलगीकरणात ठेवले. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, ‘थर्मल स्कॅनिंग’ द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिदेशांचे पालन करीत आहे. ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या नियमावलीचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.राजकारण्यांविरोधात नाराजीमुंढे यांच्या समर्थनार्थ नागरिकांकडून ‘सोशल मिडीया’वर जी मोहिम चालविण्यात येत आहे, त्यात संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मुंढे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी नागपुरकरांसाठी झटत होता. येथील नसतानादेखील ते शहरवासियांसाठी दिवसरात्र काम करत होते. मात्र राजकीय बुद्धिबळात त्यांचा बळी देण्यात आला, अशा भावना लोक व्यक्त करत आहेत. विशेषत: सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींविरोधात नाराजीचा सूर आहे.काही महिलांनी कपडे फाडून आपले चारित्र्यहनन करून बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. मुंढे यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने यातील सत्य बाहेर येण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेतील कामगार नेते जम्मू आनंद यांनी शनिवारी सदर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केली आहे.‘माफी मागा, अन्यथा पोलिसांत तक्रार करू’नागपूर : काही महिलांनी कपडे फाडून आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. यावर भाजपच्या महिला नगरसेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे.भाजपचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले की, मुंढे यांच्यासोबत जी घटना घडली त्याची वेळ व स्थळ कोणते होते याची घोषणा करावी. किती महिलांनी कपडे फाडले त्यांची संख्याही सांगायला हवी. आयुक्तांना भेटणाºया प्रत्येक व्यक्तीचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवले जाते. त्यांची नावेही जाहीर करायला हवी. ते आयएएस अधिकारी आहेत. अशी घटना घडल्यावर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता. इतके दिवस ते गप्प का राहिले. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले असा आरोपही त्यांनी केला.मग तेव्हा गप्प का राहिलेमनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. ज्या घटनेचा उल्लेख मुंढे यांनी केला आहे, त्याचे नावही त्यांनी सांगावे, अन्यथा माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलिसात तक्रार करू.- संदीप जोशी, महापौर

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण