अन् मुलाचा मृतदेहच लागला हाती

By admin | Published: December 26, 2015 03:39 AM2015-12-26T03:39:11+5:302015-12-26T03:39:11+5:30

शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकून बंगळुरला एका केमिकल कंपनीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्याचा ...

And the child's dead body has begun | अन् मुलाचा मृतदेहच लागला हाती

अन् मुलाचा मृतदेहच लागला हाती

Next

आईवडिल रेल्वेस्थानकावर आले होते ‘रिसिव्ह’ करायला
नागपूर : शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकून बंगळुरला एका केमिकल कंपनीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्याचा यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसमधून बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान रेल्वेस्थानकावर आपल्या मुलाला ‘रिसिव्ह’ करण्यासाठी आलेल्या आईवडिलांना आणि त्याच्या भावाला त्याच्या मृत्यूचीच वार्ता कळाल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
सौरभ विश्वजित मित्रा (२७) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो पंचरत्न अपार्टमेंट सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी आहे. सौरभने लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतून केमिकल इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर तो बंगळुरच्या एका केमिकल कंपनीत नोकरीला लागला. सुटी घेऊन तो यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसने नागपूरला आईवडिलांकडे परतत होता. आपण तासभरात नागपूरला पोहोचत असल्याचे त्याने आईवडिलांना कळविल्यामुळे आईवडिल नागपूर रेल्वेस्थानकावर आपल्या दुसऱ्या मुलासह पोहोचले. यशवंतपूर गोरखपूर एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक १ वर आल्यानंतर या गाडीतून त्यांचा मुलगा न उतरल्यामुळे त्यांना चिंता वाटली. लगेच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून मिसींगची तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. परंतु लोहमार्ग पोलिसांनी त्यांना आणखी थोडा शोध घेण्यास सांगून रेल्वे सुरक्षा दलात सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा सल्ला दिला. ते रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात फुटेज पाहण्यासाठी आले. त्यांनी फुटेज दाखविण्याची विनंती केली. परंतु तेवढ्यात सकाळी ११ वाजता बुटीबोरीजवळ एक युवक रेल्वेतून पडून मृत्यू पावल्याची सूचना रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. मृतदेह सौरभचाच आहे, याची खात्री पटल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलातर्फे त्याच्या भावाला माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच आईवडिलांना माहिती मिळताच त्यांच्या पायखालची वाळूच सरकली. ते ओक्साबोक्सी रडायला लागले. ही घटना पाहून रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात उपस्थित असलेल्या अनेकांना गहिवरून आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: And the child's dead body has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.