अन् १०० मिनिटांनी सुरू झाले बंद पडलेल्या ह्रदयाचे ठोके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:08 IST2026-03-18T12:07:57+5:302026-03-18T12:08:16+5:30

गंभीर अवस्थेत त्याला नेल्सन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची अवस्था अत्यंत नाजूक होती.  

And after 100 minutes, the stopped heart started beating | अन् १०० मिनिटांनी सुरू झाले बंद पडलेल्या ह्रदयाचे ठोके

अन् १०० मिनिटांनी सुरू झाले बंद पडलेल्या ह्रदयाचे ठोके

सुमेध वाघमारे -

नागपूर : सलग १०० मिनिटांहून अधिक काळ ‘सीपीआर’ देऊन डॉक्टरांनी एका ११ वर्षांच्या मुलाला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले.  नेहमीप्रमाणे मित्रांसोबत खेळून घरी परतत असताना मिरवणुकीतील वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तब्बल ५०० किलो वजनाचा जनरेटर सेट या चिमुकल्यावर कोसळला.  नागपूरमध्ये ही घटना घडली.

गंभीर अवस्थेत त्याला नेल्सन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची अवस्था अत्यंत नाजूक होती.  बालरोग तज्ज्ञ डॉ. यश बनाईत यांच्या नेतृत्वाखालील टीमने तत्काळ  व्हेंटिलेटरवर ठेवले. मात्र, अचानक त्याच्या ह्रदयाचे ठोके थांबले. डॉक्टरांनी हार मानली नाही. तत्काळ ‘सीपीआर’ देण्यास सुरुवात केली. सलग १०० मिनिटांहून अधिक वेळ ‘सीपीआर’ दिला आणि अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि मुलाच्या हृदयाचे ठोके परत आले. तो क्षण सर्वांसाठी एका चमत्कारापेक्षा कमी नव्हता. 

Web Title : 100 मिनट बाद, बंद दिल की धड़कन फिर शुरू: डॉक्टरों ने किया चमत्कार

Web Summary : नागपुर में डॉक्टरों ने एक 11 वर्षीय लड़के को जनरेटर दुर्घटना के बाद उसका दिल बंद होने पर पुनर्जीवित किया। उसे 100 मिनट से अधिक समय तक सीपीआर दिया गया। डॉक्टरों के लगातार प्रयासों से उसकी दिल की धड़कन चमत्कारिक रूप से वापस आ गई।

Web Title : After 100 Minutes, Stopped Heartbeat Restarted: Doctors Achieve Miracle

Web Summary : Nagpur doctors revived an 11-year-old boy after his heart stopped following an accident involving a generator. He received CPR for over 100 minutes. The persistent efforts of doctors led to the miraculous return of his heartbeat.