आरोपीने आणलेले जेवण केल्याने वृद्धाची हत्या; 'अशी' उघडकीस आली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 02:46 PM2022-09-24T14:46:33+5:302022-09-24T14:49:36+5:30

वाडी टी पॉईंटजवळ ही घडना घडली.

An old man was killed by eating food brought by the accused | आरोपीने आणलेले जेवण केल्याने वृद्धाची हत्या; 'अशी' उघडकीस आली घटना

आरोपीने आणलेले जेवण केल्याने वृद्धाची हत्या; 'अशी' उघडकीस आली घटना

Next

नागपूर : स्वत:चे अन्न एका वृद्धाने खाल्ल्याने संतप्त झालेल्या एका मद्यधुंद तरुणाने त्याची काठीने बेदम मारहाण करीत हत्या केली. वाडी टी पॉईंटजवळ ही घडना घडली. या प्रकरणात देवराव ऊर्फ वासुदेव रमेश बारस्कर (३८, तळेगाव, वर्धा) याला पोलिसांनी अटक केली असून, अरविंदराव बारब्दे (७५, दत्तवाडी) असे मृतकाचे नाव आहे.

दोन वर्षांपूर्वी कोविडची लागण झाल्यापासून बारब्दे हे वाडी टी-पॉईंट परिसरातच राहत होते. आरोपी देवराव हा मजुरीचे काम करतो आणि वाडी टी-पॉईंट परिसरात राहतो. त्यामुळे बारब्दे आणि देवराव एकमेकांना ओळखत होते. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बारब्दे यांनी देवरावला दारू आणण्यासाठी ४० रुपये दिले. देवरावने दारूसह स्वत:साठी वरण-भातदेखील आणला. दोघांनी बसून दारू प्यायली. बारब्दे यांनी देवरावांनी आणलेला भात खाल्ला. यावरून देवरावने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली व संतप्त देवरावने त्यांच्यावर काठीने प्रहार केले. डोक्याला मार लागल्याने बारब्दे यांचा मृत्यू झाला.

वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. शवविच्छेदनात त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले. सीसीटीव्ही बंद असल्याने कोणताही सुगावा लागला नाही. दरम्यान, एका सीसीटीव्हीमध्ये एक संशयित व्यक्ती दिसली. त्याच्या अंगकाठीवरून अनेकांची चौकशी करीत असतानाच पोलीस देवरावपर्यंत पोहोचले. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. पोलीस निरीक्षक प्रदीप वायनवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: An old man was killed by eating food brought by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.