शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपूर कारागृहात फाशीच्या कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:23 IST

अलीकडेच एका कैद्याच्या मृत्यूवरून नातेवाइकांनी तुरुंग प्रशासनावर अत्याचाराचा आरोप केला होता. कारागृहात ज्या पद्धतीने गंभीर घटना सातत्याने घडत आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देइतर कैद्यांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या एका बंदीवानाकडून दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात संबंधित कैदी जखमी झाला असून हल्लेखोर कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर कैद्यांनी वेळेत धाव घेतली नसती, तर दुसऱ्या कैद्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. हल्लेखोर कैद्याला २००६ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी सुनावण्यात आली होती. या प्रकारामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.

नावेद हुसेन खान उर्फ रशीद हुसेन खान याला हत्येच्या गुन्ह्यात मुंबई सत्र न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. १० ऑक्टोबर २०१५ पासून तो नागपूर कारागृहात आहे. फाशीचा कैदी असल्याने त्याला सुरक्षा विभागात बंदिस्त ठेवण्यात आले आहे. कोठडी क्रमांक चारमध्ये मोक्काच्या आरोपाखाली कैदेत असलेल्या झुल्फीकार जब्बार गनी याच्याशी त्याचा वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्याची तो संधी शोधत होता. २० जुलै रोजी सात वाजता नावेद बंदीस्त असलेल्या कोठडी क्रमांक तीनमधून झुल्फीकारच्या कोठडी क्रमांक चारमध्ये गेला. टॉवेलमध्ये बारीक खडी व दगड बांधून त्याने झुल्फीकारच्या डोके व मानेवर प्रहार केले.

यात तो जखमी झाला. इतर कैदी व सुरक्षारक्षकांनी लगेच धाव घेत झुल्फीकारला वाचवले. पोलीस अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या सूचनेवरून धंतोली पोलीस ठाण्यात नावेदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला आहे.

अगोदरदेखील कारागृहात मारहाणीची प्रकरणे

दोन महिन्यांपूर्वी अंडा सेलमध्ये बंदिस्त असलेल्या गुन्हेगार शेखू खानजवळ मोबाइल सापडला होता. यापूर्वी गुन्हेगार रोशन शेख यानेही फाशीच्या आवारात गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडेच एका कैद्याच्या मृत्यूवरून नातेवाइकांनी तुरुंग प्रशासनावर अत्याचाराचा आरोप केला होता. कारागृहात ज्या पद्धतीने गंभीर घटना सातत्याने घडत आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

नावेदसह मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक दहशतवादी नागपूर कारागृहात बंद आहेत. त्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच अनेक नक्षलवादी आणि त्यांचे नेतेही येथे आहेत. ताज्या घटनेने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेनंतर नावेद आणि झुल्फिकार यांच्या बराकीत बदल करण्यात आला आहे. दोघांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगnagpurनागपूर