शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

सज्ञान मुलीलाही वडिलांना पोटगी मागण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:17 IST

हायकोर्टाचा : वडिलांनी निर्णय दाखल केलेली याचिका फेटाळली

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यामधील कलम २० अनुसार स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीलाही वडिलाला पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी दिला.

२४ जानेवारी २०२४ रोजी अकोला कुटुंब न्यायालयाने एका सज्ञान अविवाहित मुलीला पाच हजार रुपये महिना पोटगी मंजूर केल्यामुळे वडिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीआरपीसी कलम १२५ अनुसार सज्ञान अविवाहित मुलगी पोटगी मिळण्यासाठी पात्र नाही, असा दावा वडिलाने केला होता. उच्च न्यायालयाने हा दावा लक्षात घेता मुलीचे हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यांतर्गतचे अधिकारही स्पष्ट केले. सीआरपीसी कलम १२५ अनुसार सज्ञान अविवाहित मुलगी तिला शारीरिक-मानसिक समस्या असेल तरच पोटगीसाठी पात्र आहे. सामान्य सज्ञान अविवाहित मुलीला या कायद्यांतर्गत पोटगी दिली जाऊ शकत नाही. परंतु, हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यामधील कलम २० अनुसार स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीला वडिलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

मुंबईत घेत आहे कायद्याचे शिक्षणप्रकरणातील मुलीचे आई-वडील कौटुंबिक वादामुळे वेगळे झाले आहेत. मुलगी आईसोबत राहत असून सध्या ती मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. तिच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे तिने कुटुंब न्यायालयात अर्ज करून वडिलाकडून पोटगी मागितली होती. 

 

टॅग्स :nagpurनागपूर