शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, वर्धा, भंडारा ओलेचिंब ; नागपूरमध्ये मात्र सूर्यनमस्कार!

By निशांत वानखेडे | Updated: August 14, 2025 19:41 IST

वेधशाळेच्या अंदाजाला हुलकावणी : विदर्भात ढगांची शांतता

नागपूर : बुधवारी दिवसभर व त्यानंतर रात्रीही धाे-धाे बरसलेल्या पावसाळी वातावरणाने गुरुवारची सकाळ हाेताच आश्चर्यकारकरित्या पलटी मारली. अंदाजानुसार स्वातंत्र्यदिनापर्यंत श्रावणसरी थांबणार नाही, असे वातावरण असताना सकाळी सूर्य दर्शनाने ही शक्यता फाेल ठरवली. विदर्भात काही जिल्ह्यात आकाश निरभ्र झाले, तर गाेंदिया, अमरावती वगळता इतर जिल्ह्यात दिवसभर ढगांनी शांतता बाळगली.

हवामान विभागाने १३ ते १५ ऑगस्टपर्यंत विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज वर्तवला हाेता. बुधवारी हा अंदाज खराही ठरला. नागपूरसह बहुतेक जिल्ह्यात श्रावणसरींनी धुवांधार हजेरी लावली. विशेष म्हणजे पावसाची तीव्रता रात्रीही कायम हाेती. पावसाने सर्व भाग व्यापून टाकला. अमरावतीवर्धा जिल्ह्यात अति पावसाची नाेंद झाली. अमरावती शहरात सकाळपर्यंत ९६ मि.मी. पाऊस झाला, तर जिल्ह्यात चांदूर रेल्वे परिसरात १०७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. वर्धा शहरातही सकाळपर्यंत ११०.२ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आर्वी, देवळी, सेलू हा परिसरही प्रभावित हाेता. अकाेला शहरात सकाळपर्यंत २४ मि.मी. नाेंद झाली, तर जिल्ह्यातील मुर्तीजापूर भागात ४८.४ मि.मी. पाऊस झाला. यवतमाळ शहरातही धुवांधार बॅटिंग करीत ७२.१ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात राळेगाव तालुक्यात ८४.५ मि.मी.पाऊस झाला.

भंडारा शहरात रात्रभर मुसळधार सरी बरसल्या. येथे ७३.५ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूर शहरात ५३ मि.मी., तर वराेरा तालुक्यात ५४ मि.मी. नाेंद झाली. गडचिराेली शहरात ढग शांत राहिले. नागपूर शहरात सकाळपर्यंत १७.९ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात हिंगणा तालुक्यात ४०.८ मि.मी. सह दमदार हजेरी लागली. सकाळपर्यंत अशी परिस्थिती असल्याने ही झड गुरुवारीही कायम राहिल, असे वाटत हाेते. सकाळपर्यंत आकाशात ढगांचे चित्रही तसे हाेते. मात्र काही वेळातच चित्र बदलले. सूर्य जसजसा वर आला, तसे ढगांमधील आर्द्रता कमी हाेत गेली. नागपूरला आकाशातून ढगही दिसेनासे झाले. दुपारनंतर पुन्हा ढगांची गर्दी झाली, पण त्यातून सरी बरसल्या नाही. केवळ अमरावतीला दिवसभर ९ मि.मी. आणि गाेंदिया येथे ७ मि.मी. नाेंद झाली. दरम्यान १५ ऑगस्टला पाऊस हाेईल, हा वेधशाळेचा अंदाज कायम आहे.

पश्चिम साेडून इतर भागात पाऊस सामान्य

जिल्हा        या काळात सामान्य पाऊस        झालेला पाऊस      कमी/अधिकनागपूर                ६१७.७                                      ६१८.९            ०भंडारा                ७१२.९                                       ७०४.५           - १गाेंदिया                ७९६.१                                      ७६३.६          - ४चंद्रपूर                ७१२.१                                        ७२५.२            २गडचिराेली            ८५२.१                                     ९२५.४            ९वर्धा                    ५६३.४                                      ५१७.८           - ८अकाेला                ४६५                                       ३२८.३          - २९अमरावती            ५४२.९                                    ३६६.५           -३२यवतमाळ              ५५०                                      ४८५.१           - १२वाशिम                ५२२.८                                    ४६०.२           - १२बुलढाणा              ४१८.४                                    ३९९.४           - ५विदर्भ                  ६२१.३                                     ५८४.९            -६

टॅग्स :nagpurनागपूरwardha-acवर्धाAmravatiअमरावतीbhandara-acभंडाराVidarbhaविदर्भ