शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वासनकर समूहाविरुध्द अमरावतीत गुन्हे

By admin | Updated: November 9, 2014 00:46 IST

पैसे दुप्पट करुन देण्याची आमिष दाखवून गुतवणुकदारांची फसवणूकप्रकरणी वासनकर समूहाविरुध्द शनिवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती : पैसे दुप्पट करुन देण्याची आमिष दाखवून गुतवणुकदारांची फसवणूकप्रकरणी वासनकर समूहाविरुध्द शनिवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमरावती पोलीस या आरोपींना प्रोड्युस वारंटवर नागपूरहून ताब्यात घेणार आहे.स्थानिक पंकज कॉलनीतील रहिवासी संजय शेळके (४५), मनीष गायकवाड व अनंत देशमुख यांनी शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात वासनकर समूहाविरुध्द तक्रार दाखल केली आहे. नागपूर येथील रहिवासी प्रशांत वासनकर हे वेल्थ मॅनेजमेंटचे संचालक आहेत. त्या अनुषंगाने ते गुतवणुकदारांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करीत होते. विविध योजनेत पैसे भरल्यास रक्कम दुप्पट किंवा तिप्पट करुन देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात येत होते. महिना, तीन महिने व वार्षिक पैसे गुंतवणूकदारांचा यामध्ये सहभाग होता. जानेवारी २०११ व ८ मार्च २०११ रोजी स्थानिक सांस्कृतिक भवन येथे वासनकर समूहाने सेमिनारचे आयोजन करुन त्यामध्ये गुंतवणूकदारांना योजनाची माहिती देऊन पैसे दुप्पट होण्याचे आमिष दाखविले होते. अनेक गुंतवणूकदारांनी सुमारे २४ लाख १ हजार रुपयांची गुतवणूक या समूहात केली होती. मात्र वासनकर समुहाने दिलेल्या वेळेनंतरही गुतवणुकदारांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी काही गुंतवणूकदारांनी नागपूर येथील अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या फसवणूक प्रकरणाचा संबंध अमरावतीशी असल्यामुळे तीन गुंतवणूकदारांनी शनिवारी सकाळी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीच्या आधारे फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी विनय वासनकर, प्रशांत वासनकर, भाग्यश्री वासनकर, चंद्रकांत राय, मनोज पांडे, अभिजित चौधरीविरुध्द भादंविच्या कलम ४०९, ४०६, ४२०, १२०, (ब) व ३ एमपीआईडी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विनय, प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी हे तिघेही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्याकडे देण्यात आला आहे. या आरोपींना अमरावती पोलीस प्रोड्यूस वारंटवर ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली.