शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

लाचखोरांकडे दिलेली रक्कम लवकर परत मिळणार

By admin | Updated: December 21, 2014 00:18 IST

भ्रष्ट लोकसेवकांच्या हातातून शासनाच्या तिजोरीत पोहचलेली रक्कम तक्रारकर्त्याला तातडीने परत देण्यासाठी एसीबीने ‘आॅफिस एक्स्पेंडिचर‘चा पर्याय शोधला आहे. कार्यालयीन खर्चासाठी मिळणाऱ्या

एसीबीने शोधला पर्याय : एक कोटी मिळालेनरेश डोंगरे - नागपूरभ्रष्ट लोकसेवकांच्या हातातून शासनाच्या तिजोरीत पोहचलेली रक्कम तक्रारकर्त्याला तातडीने परत देण्यासाठी एसीबीने ‘आॅफिस एक्स्पेंडिचर‘चा पर्याय शोधला आहे. कार्यालयीन खर्चासाठी मिळणाऱ्या निधीतून एसीबी तक्रारकर्त्यांना त्यांची रक्कम परत करणार आहे. त्यामुळे यापुढे तक्रारकर्त्यांना महिनोमहिने वाट पाहावी लागणार नाही. यामुळे भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढेल. पर्यायाने भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा हेतू प्रभावीपणे साध्य करता येईल, असा एसीबींच्या शीर्षस्थांचा अंदाज आहे. लाचखोराने मागितलेली रक्कम (नोटा) तक्रारकर्त्याला आधी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागते. या नोटांचे क्रमांक नोंदविल्यानंतर एसीबीचे अधिकारी त्या नोटांवर न दिसणारी पावडर लावतात. लाचखोराने नोटा हातात घेताच ती पावडर त्याच्या हाताला लागते. लाचखोरांचे हात पाण्यात घालताच पावडरमुळे पाणी लाल होते. त्यानंतर सापळा यशस्वी झाल्याचे मानले जाते. नंतर एसीबीचे अधिकारी या लाचखोरांच्या कार्यालयाची, निवासाची झडती घेतात. त्यातून मिळालेले दस्तावेज, दागिने, रोकड जप्त करतात. हे सर्व तसेच तक्रारकर्त्याने एसीबीच्या माध्यमातून लाचखोराच्या हातात ठेवलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाते. लाचखोराचा पीसीआर होतो. नंतर तो जामिनावरही मोकळा होतो. ही सर्व प्रक्रिया साधारणत: आठवडाभरात संपते. मात्र, तक्रारकर्त्याने एसीबीकडे जमा केलेली रक्कम परत मिळावी म्हणून त्याला एसीबी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. पूर्वी प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर रक्कम परत केली जायची. आता निकालाची प्रतीक्षा करण्याची गरज नसली तरी महिनोमहिने रक्कम परत मिळत नाही. त्याची माऊथ पब्लिसिटी होते. त्यामुळे भ्रष्ट लोकसेवकाला पकडून देण्यासाठी तक्रार करावी की नको, अशा द्विधा मन:स्थितीत अनेक जण अडकतात. दुसरे म्हणजे, लाचेची रक्कम जमा करण्याची सोय नसल्यामुळे अनेक तक्रारकर्ते एसीबीच्या कार्यालयाकडे दुसऱ्यांदा फिरकत नाही. यामुळे भ्रष्टाचारी लोकसेवकांचे (अधिकारी कर्मचारी) फावते. एक कोटी मिळालेभ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली असूनही, त्याची तक्रार करणारांचे प्रमाण फारच तोकडे आहे. त्याला जी कारणे आहेत, त्यातील एक महत्त्वाचे कारण हेच आहे. राज्यभरातील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा आपल्या शिर्षस्थांच्या ते लक्षात आणून दिले होते. तथापि, भ्रष्टाचाराला आळा घालण्यात अडसर ठरणाऱ्या या समस्येचे वरिष्ठ पातळीवरून निराकरण होत नव्हते. एसीबीचे डीजी म्हणून सूत्रे सांभाळल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यावर उपाय शोधला. त्यानुसार सापळा यशस्वी झाल्यानंतर रक्कम परत मिळण्यासाठी ‘कार्यालयीन खर्चाचे‘ तातडीने प्रपोजल तयार करायचे. नंतर एसीबीला मिळणाऱ्या निधीतून (आॅफिस एक्स्पेंडिचर) ही रक्कम परत द्यायची, असा पर्याय पुढे आला. त्यातूनच एसीबीला चार दिवसांपूर्वी एक कोटी रुपये शासनाकडून मिळाले. त्यातील १३ लाख रुपये नागपूर विभागासाठी प्राप्त झाले आहे. यामुळे तक्रारकर्त्यांना त्यांची रक्कम तातडीने परत करण्यात येणार आहे.