तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी अमरावतीचे सिद्धार्थ लढे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 20:21 IST2021-09-17T20:20:02+5:302021-09-17T20:21:02+5:30
Nagpur News देशातील भाविकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नव्या यादीत महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश करण्यात आला आहे.

तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी अमरावतीचे सिद्धार्थ लढे यांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशातील भाविकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नव्या यादीत महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश करण्यात आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने अलीकडेच ही यादी जाहीर केली आहे.
देशभरातून एकूण २४ जणांची तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील उद्योजक अजय नावंदर यांचे भाचे मूळचे अमरावतीचे रहिवासी असलेले, सिद्धार्थ लढे उर्फ गट्टू आणि शिवसेना सचिव व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांची निवड झाली आहे. सिद्धार्थ लढे हे तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे आजवरचे सर्वात तरुण सदस्य ठरले आहेत. अमरावतीशी खास नातं असलेल्या व्यक्तीला हे पद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तिरुमला-तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरे श्रीमंत धार्मिक ट्रस्ट आहे. या सदस्यांमध्ये आंध्रप्रदेशातील १०, तेलंगणा ७, तामिळनाडू २, कर्नाटक-२, महाराष्ट्र-२, गुजरात-१, प. बंगाल-१ व पुडुचेरी-१ असे सदस्य आहेत.