आमला रनिंग रुम ठरली देशभरातून अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:58 IST2019-07-31T23:57:24+5:302019-07-31T23:58:59+5:30
रनिंग रुम म्हणजे लोकोपायलट, सहायक लोको पायलट आणि गार्ड यांना विश्रांती करण्याचे ठिकाण. रेल्वेगाडी दक्ष राहून चालविता यावी यासाठी रनिंग रुममध्ये लोकोपायलटची चांगली विश्रांती झाली पाहिजे. त्यासाठी रनिंग रुममध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून रुमची देखभाल करण्यात येते. रेल्वेने केलेल्या पाहणीत नागपूर विभागातील आमला येथील रनिंग रुम अव्वल ठरली. त्यासाठी आमला रनिंग रुमला बेस्ट रनिंग रुम शिल्ड प्रदान करण्यात आली.

आमला रनिंग रुम ठरली देशभरातून अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रनिंग रुम म्हणजे लोकोपायलट, सहायक लोको पायलट आणि गार्ड यांना विश्रांती करण्याचे ठिकाण. रेल्वेगाडी दक्ष राहून चालविता यावी यासाठी रनिंग रुममध्ये लोकोपायलटची चांगली विश्रांती झाली पाहिजे. त्यासाठी रनिंग रुममध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून रुमची देखभाल करण्यात येते. रेल्वेने केलेल्या पाहणीत नागपूर विभागातील आमला येथील रनिंग रुम अव्वल ठरली. त्यासाठी आमला रनिंग रुमला बेस्ट रनिंग रुम शिल्ड प्रदान करण्यात आली.
मुंबईत झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार वितरण समारंभात ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांच्या हस्ते शिल्ड स्वीकारली. भारतीय रेल्वेत केवळ मध्य रेल्वेला एक शिल्ड देण्यात आली. आमला रनिंग रुममध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लोकोपायलटला घराबाहेर घर असल्याचा अनुभव येतो. यात सेपरेट रिडींग लॅम्प, फुट लॅम्प लावण्यात आले आहेत. भोजनाच्या दर्जावर विशेष लक्ष पुरविण्यात येते. मनोरंजनासाठी पुस्तके, विविध पत्रिका, इन डोअर गेमची व्यवस्था आहे. व्यायामासाठी हिरव्यागार लॉनमध्ये ओपन जीमची व्यवस्था आहे. ध्यानसाधनेसाठी इन डोअर रुम आणि ध्यानकुटीची व्यवस्था आहे. या सर्व सुविधा रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार आहेत की नाही याची पाहणी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक स्तरावरील समितीतर्फे करण्यात येते. ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांनी वरिष्ठ विद्युत अभियंता महेश कुमार आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले आहे. ‘डीआरएम’ सोमेश कुमार हे मुंबईवरून शिल्ड घेऊन आल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.