कथित अर्बन नक्षलवादी रेजाझची मैत्रीण शिक्षणातून सहा महिन्यांकरिता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:49 IST2025-05-28T11:48:56+5:302025-05-28T11:49:29+5:30

Nagpur : सिम्बायोसिस विद्यापीठाच्या चौकशीमध्ये आढळली दोषी

Alleged urban Naxalite Rejaz's girlfriend suspended from education for six months | कथित अर्बन नक्षलवादी रेजाझची मैत्रीण शिक्षणातून सहा महिन्यांकरिता निलंबित

Alleged urban Naxalite Rejaz's girlfriend suspended from education for six months

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
केरळमधील कथित अर्बन नक्षलवादी व मुक्त पत्रकार रेजाझ सिद्दीक (वय २६) याच्या नागपूर येथील मैत्रिणीला सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने सर्व शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रमांतून सहा महिन्यांकरिता निलंबित केले आहे. ती शिस्तभंगाच्या चौकशीमध्ये दोषी आढळून आली आहे. विद्यापीठाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.


मैत्रीण सिम्बायोसिस विद्यापीठातील बी.ए.एलएल.बी. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती लकडगंज पोलिसांना गेल्या ८ मे रोजी मारवाडी चौकातील हॉटेल प्राइमच्या खोलीमध्ये रेजाझसोबत मिळून आली होती. रेजाझने सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर व भारतीय सैन्यावर टीका केली होती, तेव्हापासून पोलिस यंत्रणा त्याच्या मागावर होती. 


पोलिसांना रेजाझच्या घरी नक्षलवादी व फुटीरतावाद्यांशी संबंधित कागदपत्रे आणि नक्षलवाद्यांसाठी आर्थिक मदत गोळा केल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याचे अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांशी आणि समर्थकांशी संबंध आहेत. तो गेल्या अनेक वर्षापासून अर्बन नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी नागपूरला येत होता.


याचिका घेतली मागे

  • सिम्बायोसिस विद्यापीठाने गेल्या १० मे रोजी रेजाझच्या मैत्रिणीला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते. त्यामुळे मैत्रिणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • त्यानंतर विद्यापीठाने न्यायालयात हजर 3 होऊन चौकशी २५ मेपर्यंत पूर्ण केली जाईल आणि चौकशीमध्ये मैत्रीण निर्दोष आढळून आल्यास शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तिची विशेष परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही दिली होती.
  • आता अंतिम कारवाईनंतर मैत्रिणीने विद्यापीठातील शिस्तपालन अपिलीय समितीकडे अपील दाखल केले आहे. त्यामुळे तिने मंगळवारी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली.

Web Title: Alleged urban Naxalite Rejaz's girlfriend suspended from education for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर