तृतीयपंथीयाकडून बलात्काराचा आरोप : आमिष दाखवून लग्न करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 22:45 IST2021-05-17T22:31:03+5:302021-05-17T22:45:41+5:30
Allegation of rape by a third gender लग्न करण्याचे आमिष दाखवून एका वाहन चालकाने बलात्कार केला. आता तो लग्नास नकार देत आहे, अशी तक्रार एका तृतीयपंथीयाने सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तृतीयपंथीयाकडून बलात्काराचा आरोप : आमिष दाखवून लग्न करण्यास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका वाहन चालकाने बलात्कार केला. आता तो लग्नास नकार देत आहे, अशी तक्रार एका तृतीयपंथीयाने सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तक्रार करणारा तृतीयपंथी ३५ वर्षांचा असून, तो दिव्यांग आहे. आरोपी राजेश उर्फ राजा प्रभाकरराव भोसले (वय ३९) हा जुना बगडगंज परिसरात राहतो. वर्षभरापूर्वी तो संपर्कात आल्यानंतर, आरोपी भोसलेने त्याला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याशी शरीरसंबंध जोडले. १२ एप्रिल, २०१९ पर्यंत या दोघांमध्ये चांगले संबंध होते. तृतीयपंथीयाने लग्नासाठी तगादा लावल्याने, आरोपीने त्याला लग्नास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तृतीयपंथीयाने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्कार, तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली.