शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून पाठविण्यात आला अलर्ट! प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त

By नरेश डोंगरे | Updated: January 25, 2026 21:25 IST

गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर, सेवाग्रामसह विदर्भातील अन्य काही रेल्वे स्थानकावर कोणतीही गडबड किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्ली, मुंबईतून 'अलर्ट' मिळाला आहे.

- नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क                                                                                                                                                                                    

नागपूर : गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील विविध रेल्वे स्थानकांवर, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हेच नव्हे तर अनेक ठिकाणच्या रेल्वे पुलांवर, बोगद्यांवरही नजर रोखण्यात आली आहे.महाराष्ट्रच नव्हे तर देशातील एक अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नागपूर रेल्वे स्थानकाचा उल्लेख होतो. देश विघातक शक्तींच्या टार्गेटवर असल्याने नागपूर रेल्वे स्थानकाचा समावेश संवेदनशिल स्थानकांमध्ये आहे. गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर, सेवाग्रामसह विदर्भातील अन्य काही रेल्वे स्थानकावर कोणतीही गडबड किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्ली, मुंबईतून 'अलर्ट' मिळाला आहे. त्यामुळे नागपूर विदर्भातील सर्व प्रमुख व संवेदनशील रेल्वे स्थानकांवर आज दुपारपासूनच सिक्युरिटी टाईट करण्यात आली आहे.

रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाकडून रेल्वे स्थानके, रेल्वे परिसर तसेच गाड्यांमध्ये कसून तपासणी केली जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. मुख्य रेल्वे स्थानक, अजनी रेल्वे स्थानक, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावरच्या सुरक्षा व्यवस्थेची सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी केली. यावेळी रेल्वे पोलिस, अधिकारी, सीआयबी, श्वान पथकाने प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटिंग एरिया, यार्ड, पार्किंग, सायकल स्टँड तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

प्रवाशांना सतर्कतेचे आवाहनरेल्वे स्थानक परिसरातील ऑटोचालक, कुली, अधिकृत विक्रेते यांच्यासोबत बैठका घेऊन कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा दल किंवा शासकीय रेल्वे पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेचे संवेदनशील विभाग, पूल, बोगदे तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरही गस्त घालण्यात येत आहे. सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीए सिस्टीम)च्या माध्यमातून प्रवाशांना सतर्क व जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Alert: Republic Day Security Tightened at Railway Stations

Web Summary : Ahead of Republic Day, railway stations, including Nagpur, are under high alert. Security has been intensified with increased surveillance, checks by sniffer dog squads, and passenger awareness campaigns. Focus is on sensitive areas like bridges and tunnels to prevent untoward incidents.
टॅग्स :nagpurनागपूर