शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!

By नरेश डोंगरे | Updated: September 24, 2024 23:26 IST

धोका पत्करण्याची गरज काय : अत्याधुनिक सुविधा उपलब्ध, कशाला हवा हा तामझाम

- नरेश डोंगरे

नागपूर : पोलिसांनी थोडीशी सतर्कता दाखवून उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा, सुविधांचा वापर केला असता तर सध्या सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणारे बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर घडलेच नसते, असे परखड मत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले. बहुचर्चित बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरने सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधाकंडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहे. यामुळे देशभर हे प्रकरण चर्चेला आले आहे. प्रत्येक जण वेगवेगळे मत मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी या एन्काऊंटरचे तटस्थ विश्लेषण केले.

ते म्हणाले, सध्या जगात डिजिटलायझेशनचा डंका वाजत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान समाजाच्या अन्य घटकांसोबतच न्यायव्यवस्था आणि पोलिसांचेही काम सुरळीत करून गेले आहे. गुन्हेगार कितीही मोठा असो की खतरनाक, त्याला पुर्वीसारखे न्यायालयात पेशीला घेऊन जाण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच मोठ्या कारागृहात व्हीडीओ कॉन्फरंसिंग (व्हीसी)ची सोय आहे. त्यामुळे संवेदशनिल प्रकरणातील आरोपीला कारागृहातूनच त्याला ऑनलाईन कोर्टात पेश करता येतं. या प्रकारात कसलाच धोका नसतो. मात्र, पोलीस ते सोडून, आरोपीला कारागृहात नेण्यासाठी विनाकारण तामझाम करतात.

संवेदनशिल गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी ८ ते १० पोलीस, स्वतंत्र वाहन लागते. वेळ जाते, उर्जा खर्ची पडते अन् सर्वात मोठे म्हणजे, त्यात मोठा धोका असतो. आरोपी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न करतो, स्वत:वर हल्ला करून जखमी करून घेतो किंवा पोलिसांवर हल्ला करतो. नंतर आरोपाच्या फैरी झडतात. तर कधीबधी असे एन्काऊंटरचे प्रकार घडतात. या प्रकरणात नेमके काय झाले अन् कसे झाले, याबद्दल वेगवेगळे तर्क मांडणे, अंदाज काढणे स्वाभाविक आहे. मात्र, पोलिसांनी थोडीशी सतर्कता दाखवत आरोपीला न्यायालयात नेण्याच्या भानगडीत न पडता त्याची कारागृहातूनच ऑनलाईन पेशी केली असती, तर हा प्रकारच घडला नसता, असेही दीक्षित म्हणाले.

प्रसंगी कोर्टाचे कामकाजही तुरुंगातचनव्या भारतीय न्याय संहितेत डिजिटलयाझेशनचा (तंत्रज्ञानाचा) वापर व्हावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात, ईतकेच काय, आम्ही भारतातून परदेशातील कारागृहात असलेला २६/११ चा आरोपी डेव्हीड कोलमन हेडलीची साक्ष नोंदविली आहे. दुसरे म्हणजे, गरज वाटल्यास न्यायालयही तुरुंगात जाऊन कामकाज चालविते.

हा धोका असाच राहीलन्यायव्यवस्थेशी संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी आताही पारंपारिकपणा सोडला नाही आणि प्रगत तंत्रज्ञानाचा उपरययोग केला नाही तर ही 'एन्काऊंटर'सारख्या प्रकाराचा धोका, असाच कायम राहिल, असेही मत दीक्षित यांनी नोंदविले आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरPoliceपोलिसnagpurनागपूर