शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणार अकोल्याचा ठगबाज जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:14 PM

देखण्या मुलाचा फोटो लावून डॉक्टरच्या नावाने प्रोफाईल बनविणाऱ्या तसेच त्याआधारे शादी डॉट कॉमवर महिलांशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अकोल्याच्या ठगबाजाला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देसैन्यात डॉक्टर असल्याची करीत होता बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देखण्या मुलाचा फोटो लावून डॉक्टरच्या नावाने प्रोफाईल बनविणाऱ्या तसेच त्याआधारे शादी डॉट कॉमवर महिलांशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अकोल्याच्या ठगबाजाला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. शरद वसंत चौहाण (वय ३७, रा. डापकी रोड, अकोला) असे आरोपीचे नाव आहे.ठगबाज चौहाणने एका देखण्या तरुणाचा फोटो लावून डॉ. प्रसन्ना बोरकर नावाने फेक प्रोफाईल तयार केले होते. हे प्रोफाईल शादी डॉट कॉमवर अपलोड करून तो लग्नास इच्छुक महिलांशी संपर्क साधत होता. आपण छत्तीसगडमध्ये लष्कराच्या डीआरडीओत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून लग्नास तयार असल्याचे तो वेगवेगळ्या महिला-तरुणींना कळवत होता. त्यानंतर त्यांच्या सलग संपर्कात राहून त्यांचा विश्वास जिंकायचा. गिट्टीखदानमधील एका महिलेशी त्याने असेच केले. तिला लग्न करणार, असे आमिष दाखवून तिच्याशी तो निरंतर संपर्कात राहू लागला. डिसेंबर २०१८ मध्ये त्याने तिला अचानक फोन करून आपली बदली जम्मू-काश्मीरमध्ये झाल्याचे सांगितले. तेथे दहशतवाद्यांचा नेहमी धोका असल्याने ही बदली रद्द करण्यासाठी वरिष्ठांना रक्कम द्यायची आहे, अशी बतावणी केली. त्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. आपण पती-पत्नी होणार असल्याने माझी सर्व संपत्ती तुझीच होणार आहे, अशी मखलाशीही केली. त्याच्या भूलथापेला बळी पडून पीडित महिलेने आरोपी चौहाणने सांगितलेल्या पुण्यातील एका बँक खात्यात १६ डिसेंबर २०१८ ला १ लाख ३० हजार रुपये जमा केले. ही रक्कम काढून घेतल्यानंतर आरोपीने या महिलेशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदविली. परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय अढाऊ, उपनिरीक्षक योगेश खरसान, नायक राकेश गोतमारे तसेच सायबर शाखेतील सहायक निरीक्षक शिरे, उपनिरीक्षक झाडोकर यांनी आरोपीचा फेक प्रोफाईलच्या आधारे शोध घेतला. तो अकोल्यात असून त्याचे नाव चौहाण असल्याचे कळताच पोलीस पथकाने अकोल्यात जाऊन त्याच्या मुसक्या बांधल्या.अनेकींना फसविलेठगबाज चौहाणची चौकशी केली असता त्याने डॉ. प्रसन्ना बोरकरच्या नावाने बनावट प्रोफाईल बनवून अनेक महिलांना फसविले. त्यांना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून ४ लाख, १० हजारांची रोकड जप्त केली. ठगबाज चौहाणने टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या गुन्हेगारी मालिका पाहून ठगबाजीचा हा फंडा अवलंबिल्याचे स्पष्ट झाले. या आरोपीकडून फसगत झालेल्या महिलांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी केले आहे. त्यांची माहिती गुप्त ठेवून त्यांना कायदेशीर मदत केली जाईल, असेही उपायुक्त पंडित यांनी कळविले आहे

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक