शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजनी आणि गोधनी ही दोन रेल्वेची उपस्थानके म्हणून नावारुपाला येतील  - गडकरी

By नरेश डोंगरे | Updated: August 6, 2023 19:28 IST

केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

नागपूर : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत्वाने होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोधनी स्थानकावर आज केले.

अमृत भारत स्टेशयोजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला.न या प्रकल्पात महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश असून त्यासाठी दीड हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निमित्ताने गोधनी रेल्वे स्थानकावर गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, काटोल, नरखेड येथून मोठ्या प्रमाणात लोक नागपूरला येतात. आधुनिकिकरणामुळे या स्थानकांवर जास्तीत जास्त गाड्यांना थांबा मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची विशेष सोय होणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकानंतर आता अजनी आणि गोधनी ही दोन उपस्थानके म्हणून नावारुपाला येतील,’ असेही ते म्हणाले.

रेल्वे मंत्र्यांना मेट्रोचा प्रस्तावनागपूर येथून अमरावती, गोंदिया, वर्धा, नरखेड, वडसा आदी ठिकाणांसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना दिला आहे. त्यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्थानके विकसित करताना चांगले रस्ते, पार्किंगची व्यवस्था याकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कारही यावेळी गडकरींच्या हस्ते करण्यात आला.

ट्रॉली बस चालविणारपुनर्विकासानंतर गोधनी स्थानकाची उपयोगिता वाढविण्यासाठी येथे आउटर रिंग रोडच्या माध्यमातून ट्रॉली बस चालविण्याचा विचारही गडकरींनी बोलून दाखविला. ही बस काटोल आणि एमआयडीसी, हिंगणा येथून चालविली जाईल. 

टॅग्स :nagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरी