एअर इंडियाचे दिल्लीकरिता विशेष उड्डाण शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 20:32 IST2018-05-16T20:32:33+5:302018-05-16T20:32:48+5:30
एअर इंडियाचे एक विशेष उड्डाण १८ मे रोजी नागपूर ते दिल्लीकरिता उपलब्ध होणार आहे. ३४५ प्रवासी क्षमतेचे जंबो जेट नागपुरातून १८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होईल. नागपूर ते दिल्लीचे भाडे ३००० रुपये राहणार आहे.

एअर इंडियाचे दिल्लीकरिता विशेष उड्डाण शुक्रवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: एअर इंडियाचे एक विशेष उड्डाण १८ मे रोजी नागपूर ते दिल्लीकरिता उपलब्ध होणार आहे. ३४५ प्रवासी क्षमतेचे जंबो जेट नागपुरातून १८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होईल. नागपूर ते दिल्लीचे भाडे ३००० रुपये राहणार आहे.
एअर इंडियाचे हे विमान एप्रिल महिन्यात एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये देखभाल, दुरुस्तीसाठी आणले होते. परतीच्या मार्गात या विमानाचे संचालन व्यावसायिक स्वरुपात डीजीसीएच्या विशेष परवानगीनंतर करण्यात येणार आहे. एअर इंडियाचे वरिंष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, बोर्इंग-७७७ मध्ये चार फर्स्ट क्लास सीट, ३५ बिझनेस क्लास आणि ३०३ एकॉनॉमिक सीट्स आहेत.
एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरुस्तीसाठी विमानांची ये-जा सुरू आहे. गुरुवार, १७ मे रोजी एअर इंडियाचे विमान देखभाल, दुरुस्तीसाठी एमआरओमध्ये येणार आहे. त्यानंतर या विमानाचा उपयोग विशेष विमानाच्या स्वरुपात करण्यात येणार आहे.
विमान एक तास उशिरा रवाना
मंगळवारी रात्री एअर इंडियाचे एआय-६३० हे विमान आपल्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा मुंबईला रवाना झाले. या विमानाच्या उड्डाणाची वेळ १० वाजता होती. पण काही कारणांमुळे विमानाने अर्धा तास उशिरा उड्डाण भरले. उड्डाण अर्धा तास उशिराने होणार असल्याचा मोबाईल संदेश प्रवाशांना पाठविण्यात आला होता.