शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाची नागपूर-दिल्ली नवीन ‘रेड आय’ फ्लाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 11:21 IST

एअर इंडिया २८ सप्टेंबरपासून नागपूर-दिल्ली दरम्यान ‘रेड-आय’ फ्लाईट सुरू करीत आहे. या विमान प्रवासाचा दर कमी राहील.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर इंडिया २८ सप्टेंबरपासून नागपूर-दिल्ली दरम्यान ‘रेड-आय’ फ्लाईट सुरू करीत आहे. या विमान प्रवासाचा दर कमी राहील. हे विमान नागपुरातून रात्री उडणार आहे. तर परतीचा प्रवासही दुसऱ्या दिवशी रात्री करणार आहे. सध्या एअर इंडियाची नागपूर-दिल्ली प्रवासी सेवा सुरूच आहे.एअर इंडियाची नवीन ‘रेड-आय’ फ्लाईट एआय-६४१ ही २७ सप्टेंबरला रात्री ११.३० वाजता दिल्लीहून नागपूरसाठी उडेल. रात्री १२.४० ला ही फ्लाईट नागपुरात पोहचेल. त्यानंतर एआय-६४२ ही फ्लाईट रात्री २ वाजता नागपूरहून दिल्लीसाठी उडेल. पहाटे ३.४० वाजता दिल्लीला पोहचेल. १८० प्रवासी क्षमतेचे हे विमान आहे. या विमान प्रवासाचे भाडे २००० रुपये राहणार आहे. व्यावसायिक, वकील, सरकारी कामकाजासाठी अवागमन करणाऱ्यांना हे विमान अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात येत आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्यांना हॉटेलमध्ये थांबविण्यासाठी खर्च करावा लागणार नाही. दिल्लीत पोहचल्यानंतर आपले कामकाज करून रात्री ११.३० वाजताच्या याच विमानाने नागपुरात पोहचणे त्यांना शक्य होईल.

काय आहे ‘रेड-आय’‘रेड आय’ म्हणजे लाल डोळे, रात्रीच्या प्रवासात झोप होत नसल्यामुळे प्रवाशांचे डोळे लाल होतात. हे विमान रात्रीला प्रवास करणार असल्यामुळे विमानाला ‘रेड-आय’ हे नाव देण्यात आले आहे. युरोपमध्ये मध्यरात्रीच्या विमानसेवेचे चांगलेच चलन आहे. रात्री प्रवाशी उड्डाणांना रणवे सहज क्लिअर मिळतो. त्यामुळे विमान ‘लेट’ होण्याची शक्यता फार कमी आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर