शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

'एअर इंडिया एक्स्प्रेस' उड्डाणासाठी सज्ज, १ डिसेंबरला नागपुरातून करेल 'टेक-ऑफ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:23 IST

Nagpur : एअर इंडिया एक्स्प्रेस या उड्डाणांसाठी १८०-सीटर विमानाचा वापर करणार आहे. लो-कॉस्ट कॅरिअर (एलसीसी) फ्लाइट असल्याने बहुतांश प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथून बेंगळुरू दरम्यान १ डिसेंबरपासून एअर इंडिया एक्स्प्रेसची सकाळ आणि सायंकाळची उड्डाणे सुरू होणार आहेत. तीन दिवसांपूर्वी या नव्या फ्लाइट्सची बुकिंग सुरू झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक बुकिंग पूर्ण झाली होती.

फ्लाइट क्रमांक आयएक्स-२०९७ बेंगलुरू-नागपूर सकाळी ७.२५ वाजता बेंगळुरूहून रवाना होऊन ९.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात आयएक्स-२०९८ नागपूर-बेंगळुरू सकाळी १० वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी १२.०५ वाजता बेंगळुरूला उतरेल.

संध्याकाळी आयएक्स-२७९३ बेंगळुरू-नागपूर फ्लाइट सायंकाळी ६.३० वाजता डिपार्ट होऊन रात्री ८.३५ वाजता नागपूरमध्ये लैंड होईल. परतीची फ्लाइट आयएक्स-२७९४ नागपूरहून रात्री ९.०५ वाजता टेक-ऑफ करून ११.१० वाजता बेंगळुरूला पोहोचेल.

एअर इंडिया एक्स्प्रेस या उड्डाणांसाठी १८०-सीटर विमानाचा वापर करणार आहे. लो-कॉस्ट कॅरिअर (एलसीसी) फ्लाइट असल्याने बहुतांश प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे, आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूसाठी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने आयटी प्रोफेशनल्सची ये-जा सुरू असते. नागपुरात या लो-कॉस्ट कॅरिअरच्या आगमनाने इंडिगो एअरलाइन्सला स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. प्रत्यक्षात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणांची टायमिंगही अधिक सोयीस्कर असल्याचे सांगितले जात आहे. या एअरलाइन्सला ग्राऊंड हँडलिंग सेवा एआयएएसएलच उपलब्ध करून देणार आहे. आयएक्सच्या या चार नव्या उड्डाणांच्या समावेशाने नागपूर विमानतळावरील एकूण उड्डाणांची संख्या आता ५२ वर पोहोचली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Air India Express to Take Off from Nagpur on December 1st

Web Summary : Air India Express launches Nagpur-Bengaluru flights from December 1st. Two daily flights offer convenient timings with high booking rates. The low-cost carrier uses 180-seater planes, benefiting IT professionals. Nagpur airport flight count reaches 52.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाnagpurनागपूरairplaneविमान