Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव

By दयानंद पाईकराव | Updated: June 13, 2025 07:53 IST2025-06-13T07:53:03+5:302025-06-13T07:53:58+5:30

Ahmedabad Air India Flight AI171 Crash :नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार - मोढा हिच्या सासऱ्यांचा महिनाभरापूर्वी अहमदाबादमध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. लंडनमधील त्यांच्या आप्तस्वकियांनी शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेला जाण्यासाठी यशा कामदार-मोढा, तिचा चिमुकला रुद्र मोढा आणि सासू रक्षा मोढा हे गुरुवारी निघाले होते.

Ahmedabad Plane Crash :...then the lives of Yasha, Rudra and Raksha would have been saved. | Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव

Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव

- दयानंद पाईकराव
नागपूरनागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार - मोढा हिच्या सासऱ्यांचा महिनाभरापूर्वी अहमदाबादमध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. लंडनमधील त्यांच्या आप्तस्वकियांनी शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेला जाण्यासाठी यशा कामदार-मोढा, तिचा चिमुकला रुद्र मोढा आणि सासू रक्षा मोढा हे गुरुवारी दुपारी विमानतळावर गेले. परंतु, काही महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्यामुळे त्यांच्याकडे लंडनला जाण्यासाठी काही कागदपत्रं कमी होती. विमान कंपनीने त्यांना प्रवासाची परवानगीही नाकारली. यशाचे पती किशन त्यांना घरी परत नेण्यासाठी विमानतळावर आले. परंतु, ऐनवेळी यशाची सासू रक्षा यांनी एअर इंडिया कंपनीची समजूत घातल्यामुळे त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली अन् काही वेळातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. विमान कंपनी आपल्या अटी, शर्तींवर कायम राहिली असती, तर या तिघांचाही मृत्यू टळला असता.

यशा मनीष कामदार हिचे लग्न तीन वर्षांपूर्वी लंडनमधील किशन मोढा यांच्यासोबत झाले होते. लंडनमध्ये किशन मोढा यांचा फरसाणचा मोठा व्यवसाय होता. परंतु, नातेवाइक राहात असल्यामुळे आणि किशन यांच्या वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू असल्यामुळे त्यांचे नेहमीच अहमदाबादला येणे-जाणे होते.  

सहा दिवसांनी येतो म्हणाले...
यातच काही दिवसांपूर्वी मोढा कुटुंबीयांनी आपला लंडनमधील व्यवसाय बंद करून अहमदाबादमध्ये बायोमास पॅलेट फॅक्टरी म्हणजे कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्लान्ट सुरू केला होता. किशन मोढा यांचा व्यवसाय चांगला सुरू असताना महिनाभरापूर्वी त्यांच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. अहमदाबादमध्येच त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. परंतु, इतकी वर्षे लंडनला राहिल्यामुळे तेथेही मोढा कुटुंबीयांचे नातेसंबंध निर्माण झाले होते.
याच संबंधातून तेथील काही नागरिकांनी किशन यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित केली होती. याच शोकसभेला यशा, तिचा चिमुकला रुद्र आणि सासू रक्षा जात होते. परंतु, व्यवसायाच्या कारणामुळे यशाचे पती किशन यांनी मी पाच-सहा दिवसानंतर लंडनला येतो, असे सांगितल्याने तिघे लंडनला निघाले. त्यांचे विमान अवकाशात झेपावताच काही वेळातच त्यांच्या विमानाला अपघात होऊन काळाने त्यांच्यावर झडप घातली.
 

Web Title: Ahmedabad Plane Crash :...then the lives of Yasha, Rudra and Raksha would have been saved.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.