तुळशी विवाहनंतर वाजणार सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 20:44 IST2019-11-05T20:42:18+5:302019-11-05T20:44:15+5:30

विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे.

After the Tulsi marriage sound Sanai Chaughade | तुळशी विवाहनंतर वाजणार सनई चौघडे

तुळशी विवाहनंतर वाजणार सनई चौघडे

ठळक मुद्देदोन महिन्यात १४ विवाह मुहूर्त : मंगल कार्यालय झाले फुल्ल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जून महिन्यापासून थांबलेल्या विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे. विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे.
दोन मनांचे मिलन घडविणारा आणि दोन कुटुंबाना जोडणारा विवाह संस्कार सोहळा समीप आला आहे. तुळशी विवाहाला ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. १२ नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. साधारणत: तुळशी विवाहाच्या मुहूर्तापासून विवाहांना सुरुवात केली जाते. त्या अनुषंगाने ९ नोव्हेंबरपासूनच लग्नाचा पहिला बार फुटणार आहे.
गेल्यावर्षी गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरू झाली होती. नागपुरातील प्रसिद्ध पंचांगानुसार नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे ७ मुहूर्त असून मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग आधीच करण्यात आले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिने मिळवून १४ शुभ मुहूर्त आहे. तसे वेगवेगळ्या पंचांगानुसार विवाहाचे मुहूर्त कमी जास्त आहे. डिसेंबरच्या १२ तारखेपासून गुरूचा अस्त असल्यामुळे थेट जानेवारीच्या १८ तारखेलाच विवाह मुहूर्त असल्याचे प्रसिद्ध ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
त्या दृष्टिकोनातून शहरातील मंगल कार्यालय फुल्ल झाले आहे. शहरात साधारणत: दोनशेच्या जवळपास मंगल कार्यालय आहेत. लॉनचीही संख्या बरीच आहे. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतचे बुकिंग झाले आहे. मे आणि जूनचे बुकिंग सध्या सुरू आहे, असे मंगल कार्यालयाचे मालक देवदत्त फडणवीस यांनी सांगितले.
 नागपूरच्या प्रसिद्ध पंचांगानुसार असे आहेत मुहूर्त
नोव्हेंबर ९,१०,११,१४, २०,२३,२८
डिसेंबर १,२,३,६,८,११,१२
जानेवारी, १८,२०,२९,३०,३१
फेब्रुवारी १,४,१२,१४,१६,१८,२६,२७
मार्च ३,४,११,१२,१९
एप्रिल १५,१६,२६,२७
मे २,५,६,८,१२,१४,१८,१९,२४,
जून १४,१५,२९,३०
पुढे जुलै ते ऑक्टोबरपर्यंत मुहूर्त नसल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

 शुभ मुहूर्त म्हणजे चांगली वेळ
विवाह मुहूर्तासाठी केवळ तारखेलाच महत्त्व नाही तर त्या दिवशीची वेळ कशी आहे याला महत्त्व असते. चंद्र, शुक्र, गुरु, बुध हे शुभ ग्रह आहे. त्यांची दिशा यावरून मुहूर्त ठरतो. विवाह मुहूर्तात जी घटिका काढली जाते, तिला महत्व असते. शास्त्रात मुहूर्ताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा पत्रिकेवर जी वेळ दिली आहे, ती वेळ प्रत्येकाने पाळल्यास, विवाहाचा शुभ सोहळा शुभ ठरतो, असे डॉ. अनिल वैद्य म्हणाले.

Web Title: After the Tulsi marriage sound Sanai Chaughade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.