लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यातून शिक्षण विभाग अद्याप सावरलेला नसताना, नागपूरजिल्हा परिषदशिक्षण विभागात आणखी एक गंभीर गैरव्यवस्थेचा प्रकार उघडकीस आला आहे. विभागातील शंभरहून अधिक महत्त्वाच्या फायली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
विभागात लक्ष्मी दर्शनाशिवाय फाइल पुढे सरकत नाही, असे आरोप होत होते. शालार्थ घोटाळ्याने हे स्पष्ट झाले होते. आता थेट फायलीच अदृश्य झाल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकरणात आवक-जावक शाखेतील एका कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तपासानंतर आणखी कर्मचारी व अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
एकीकडे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित, दुसरीकडे महत्त्वाच्या फायली गायब आणि जबाबदारीचा अभाव अशा कारभारामुळे त्यात संपर्ण शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेतर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यापासून दोन्ही विभागांचे शिक्षणाधिकारी विविध कारणांनी प्रामुख्याने पुण्यात मुक्कामी असतात. त्यात पुन्हा फाइल गायब होण्याचा प्रकार घडल्याने जि.प. प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
गोंधळ खपवून घेणार नाहीया पार्श्वभूमीवर सीईओ विनायक महामुनी यांनी सोमवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विभागप्रमुखांना धारेवर धरले. त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, प्रशासनातील गोंधळ, बिनधास्तपणा आणि फाइल गायब होणे सहन केले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
समायोजन, अनुकंपा भरती, मंजुरीच्या फाइल्स गायबगायब झालेल्या फायलींमध्ये शिक्षक समायोजन, अनुकंपा भरती आणि मंजुरी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या फायलींचा ठावठिकाणा नाही. विशेष म्हणजे, आवक-जावक नोंदींची नोंदही नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यपद्धतीवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे.