ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगच्या मेसेज पाठवल्याने नागपुरातील तरुणाने खाल्ला मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:05 IST2017-12-13T21:02:18+5:302017-12-13T21:05:20+5:30

ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तिच्या पतीने त्याला आणि त्याच्या दोन मित्राला या मेसेजचे निमित्त करून बेदम चोप दिला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

After sending a good morning message to the woman, young man was beaten by her husband | ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगच्या मेसेज पाठवल्याने नागपुरातील तरुणाने खाल्ला मार

ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगच्या मेसेज पाठवल्याने नागपुरातील तरुणाने खाल्ला मार

ठळक मुद्देमहिलेच्या पतीकडून मिळाला प्रसाद

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तिच्या पतीने त्याला आणि त्याच्या दोन मित्राला या मेसेजचे निमित्त करून बेदम चोप दिला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सचिन कृष्णराव रामटेककर (वय २२) हा पाचपावलीत राहतो. त्याने नीरज जैन नामक व्यक्तीच्या पत्नीला मंगळवारी गुड मॉर्निंगचा मेसेज पाठविला. तो नीरजने वाचला. नीरजने लगेच सचिनला फोन करून विचारणा केली. त्याने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्याला मेहंदीबागेतील खैरीपुरा चौकात भेटायला बोलवले. मंगळवारी दुपारी ४ वाजता सचिन त्याच्या कुणाल गुप्ता व शुभम बाजीराव नामक मित्रांसह तर नीरज आपल्या सात ते आठ मित्रांना घेऊन उड्डाण पुलाखाली आला. तेथे या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर नीरज आणि त्याच्या मित्रांनी सचिन तसेच त्याच्या दोन्ही मित्रांना बेदम चोप दिला. त्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. कशीबशी सुटका करून घेत तेथून सचिन पळाला. त्याने नंतर शांतिनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: After sending a good morning message to the woman, young man was beaten by her husband

टॅग्स :Crimeगुन्हा