शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गणेशोत्सवानंतर टेकडी उड्डाण पूल पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:07 PM

नागपूर रेल्वे स्थानक परिसर सुशोभित करणे, वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे, यासाठी त्या परिसराच्या विकासाचीही जबाबदारी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली. या परिसराच्या विकासाचे संकल्पचित्र नागपूर मेट्रोने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मंगळवारी बैठकीत सादर केले. या नियोजनाची प्रशंसा करीत गणेशोत्सवानंतर २५ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकासमोरील मानस चौक ते जयस्तंभ चौक दरम्यानचा टेकडी उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ठळक मुद्देगडकरी यांचे निर्देश : नेताजी मार्केटचा विकास मेट्रो करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वे स्थानक परिसर सुशोभित करणे, वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे, यासाठी त्या परिसराच्या विकासाचीही जबाबदारी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली. या परिसराच्या विकासाचे संकल्पचित्र नागपूर मेट्रोने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मंगळवारी बैठकीत सादर केले. या नियोजनाची प्रशंसा करीत गणेशोत्सवानंतर २५ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकासमोरील मानस चौक ते जयस्तंभ चौक दरम्यानचा टेकडी उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.मुंजे चौकालगत असलेल्या नेताजी मार्केटचाही विकास नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने करावा. त्यातून होणाऱ्या मिळकतीतील ५० टक्के नफा नागपूर महापालिकेला द्यावा, असेही निर्देश गडकरी यांनी दिले.जरीपटका रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात कराकेंद्रीय रस्ते निधीतून नागपुरात इटारसी रेल्वे लाईनवरील जरीपटक्याला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन तातडीने करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले. या निधीतून नागपूर शहरात चार रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे.अंबाझरी, फुटाळा, तेलंगखेडीचे सौंदर्यीकरणअंबाझरी उद्यान विकासाकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे न सोपविता महापालिकेनच अंबाझरी उद्यानाचा विकास करावा. फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरचा प्लान तयार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. तेलंगखेडी उद्यानातील कृषी कन्व्हेंशन सेंटरचे कार्य आणि विवेकानंद स्मारक येथे लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो या सर्व कामांची सुरुवात तातडीने करा, असे निर्देश गडकरी यांनी बैठकीत दिले.‘साई’च्या कामाला सुरुवात करास्पोर्ट अथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अंतर्गत वाठोडा येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करा, प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी गौण निधीतून ३० कोटी उपलब्ध करा, यासोबतच ३० कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त होतील. यातून तातडीने साईचे काम सुरू करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. तसेच याच परिसरात सिम्बॉयसीस सह रेमंडच्या शाळेकरिता आठ एकर जागा करण्याचे निर्देश देण्यात आले.शाळा पाडण्यासाठी नोटीस बजवावंजारी नगर जलकुंभ ते अजनी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या प्रस्तावित मार्गासाठी सीआरएफ मधून ५०.३ कोटी मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम करावयाचे आहे. यासाठी तातडीने निविदा काढा, रेल्वेच्या जागेचा प्रश्न निकाली काढा, मार्गात अडथळा असलेले केंद्रीय विद्यालय पाडण्याची नोटीस बजवा, रेल्वेची जागा लीजवर घेण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहा. डीपी आराखड्यात माझे घर येत असेल तर तेही पाडावे लागेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.रामझुल्याचा विस्तार कस्तूरचंद पार्कपर्यंतरामझुल्याच्या दुसऱ्या बाजूचे काम गतीने सुरू आहे. दोन्ही बाजूने रहदारी सुरू झाल्यानतंर वाहनांची वर्दळ वाढणार आहे. याचा विचार करता रामझुल्याचा विस्तार कस्तूरचंद पार्कपर्यंत करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. रामझुला ‘एलिवेटेड’स्वरुपाचा बनविण्यात यावा. त्याची उतरती बाजू कस्तूरचंद पार्कपर्यंत ठेवा. यामुळे जयस्तंभ चौकात वाहतुकीवर ताण येणार नाही. तसेच लोहापूल जवळ पुश बॉक्स पद्धतीचा मार्ग तयार के ल्यास लोहापूल येथील वाहतूक सुरळीत होईल, अशी सूचनाही त्यांनी केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर