नागपुरात  साक्षगंधानंतर भावी पतीचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:08 IST2018-03-21T23:08:07+5:302018-03-21T23:08:36+5:30

साक्षगंध झाल्याबरोबर भावी पत्नीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने रामटेक येथे हॉटेलवर नेऊन भावी पतीने अत्याचार केल्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

After engagement ceremony future husband raped in Nagpur | नागपुरात  साक्षगंधानंतर भावी पतीचा अत्याचार

नागपुरात  साक्षगंधानंतर भावी पतीचा अत्याचार

ठळक मुद्दे पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : साक्षगंध झाल्याबरोबर भावी पत्नीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने रामटेक येथे हॉटेलवर नेऊन भावी पतीने अत्याचार केल्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपीन कुंभारे (२८) रा. सुभाष वॉर्ड, माळगी, भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माळगी येथील रहिवासी विपीन कुंभारे नामक तरुणाचे पाचपावली ठाण्यांतर्गत राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीसोबत साक्षगंध झाले. त्यानंतर दोघांचे मोबाईलवरून बोलणे सुरू झाले. यावेळी विपीन भावी पत्नीला बाहेर फिरायला चलण्यासाठी वारंवार गळ घालू लागला. पण ती कोणते न कोणते कारण सांगून टाळू लागली. अखेर विपीनने खूपच हट्ट केल्यामुळे ती तयार झाली. मंगळवारी विपीनने स्वत:च्या दुचाकीने नागपुरात फिरविल्यानंतर रामटेकला नेले आणि तिथे एका हॉटेलवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण हे विवाहापूर्वी योग्य नसल्यामुळे तिने विरोध केला. यावरून संतापलेल्या विपीनने तिला बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी विपीन कुंभारेविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. पाचपावली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: After engagement ceremony future husband raped in Nagpur