शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

निवडणुकांनंतर चौकीदार तुरुंगात असेल - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 5:30 AM

सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी

योगेश पांडे / आनंद डेकाटे

नागपूर : राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च वाटाघाटी करून बोलणी करण्याची प्रक्रियाच नष्ट केली. आम्ही सत्तेवर येताच राफेल घोटाळ्याची चौकशी करू आणि चौकीदार तुरुंगात असेल, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. येथे नाना पटोले (नागपूर) व किशोर गजभिये (रामटेक) या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची गुरुवारी सभा झाली. राज्यातील पहिल्याच सभेत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. व्यासपीठावर काँँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे प्रभारी आशिष दुवा, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पीरिपाचे अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत आदी उपस्थित होते.

खा. गांधी म्हणाले, राफेल घोटाळा कुणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच जे काही विचारायचे ते वरिष्ठांना विचारा असे ते म्हणाले होते. मोदी यांनी कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला. मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. संसद, विधिमंडळ व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊ.मोदी यांचे आता वय झाले आहे. त्यांना घाई आहे व त्यामुळेच ते विविध योजनांची नावे घेऊन खोटे बोलतात. मला कसलीही घाई नाही. मी दोन-तीन दिवसांसाठी राजकारण करण्यासाठी आलेलो नाही.मला जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करायचे आहे. पुढील १५-२० वर्षे मी जनतेसोबत असेल, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना चिमटा काढला.

लालकृष्ण अडवाणी यांचा दाखला देत राहुल गांधी यांनी मोदींच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला. अडवाणी हे मोदींचे गुरू होते. मात्र आता त्यांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांच्या वाट्याला केवळ अपमान आला. आपल्या गुरूचा सन्मान करा, असे हिंदू धर्म सांगतो. मात्र अडवाणी यांची हेटाळणी करणाºया मोदींचा हा हिंदू धर्म आहे का, असा सवाल गांधी यांनी केला.

असा आला ७२ हजारांचा आकडाच्काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजनेचा ७२ हजारांचा आकडाकसा समोर आला हे सांगताना ते म्हणाले की, आम्ही काही नामांकित अर्थतज्ज्ञांना अर्थव्यवस्थेला धक्का न लागता गरिबांना मदत कशी होईल, हे विचारले. त्यांनी अभ्यासानंतर ७२ हजार हा आकडा काढला. या रकमेमुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार नाही असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.चव्हाण-दर्डा यांनी केले राहुल गांधी यांचे स्वागत

च्नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहुल गांधी यांचे आगमन झाले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षखा. अशोक चव्हाण व लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आदींनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. यावेळीगांधी हे दर्डा यांना बाजूला घेऊन गेले आणि त्यांच्याशी काही वेळ एकांतात चर्चा केली.

मेड इन विदर्भ‘मेक इन इंडिया’ योजना चांगली होती. मात्र यामुळे मूठभर लोकांचाच फायदा झाला. विदर्भातील शेतकऱ्याचा माल थेट लंडन, अमेरिकेत विकला जावा, असे आमचे ‘व्हिजन’ आहे. आता जागोजागी ‘मेड इन चायना’ दिसते. मात्र भविष्यात चीनमध्ये ‘मेड इन विदर्भ’ दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकnagpurनागपूर