पॅरोलवर बाहेर आल्यावर खुनाचा आरोपी झाला वासनांध, आईलेकीवर अत्याचार

By योगेश पांडे | Updated: January 27, 2024 20:11 IST2024-01-27T20:10:58+5:302024-01-27T20:11:11+5:30

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

After coming out on parole, Vasanandha was accused of murder, Aileki was tortured | पॅरोलवर बाहेर आल्यावर खुनाचा आरोपी झाला वासनांध, आईलेकीवर अत्याचार

पॅरोलवर बाहेर आल्यावर खुनाचा आरोपी झाला वासनांध, आईलेकीवर अत्याचार

नागपूर: खुनाची शिक्षा भोगत असलेला एक गुन्हेगार पॅरोलवर बाहेर आल्यावर वासनांध झाला व त्याने ओळखीच्या महिलेसोबतच तिच्या अल्पवयीन मुलीवरदेखील अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

कुणाल भारत गोस्वामी (३३, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. २०१४ साली त्याने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हत्या केली होती. या आरोपात त्याला अटक झाली होती व तो शिक्षा भोगत आहे. त्याची जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहणाऱ्या एका महिलेशी ओळखी होती. एप्रिल २०२३ मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्याने त्या महिलेकडे जात तिच्या घरी कुणीही नसताना तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने तिला गप्प राहण्यासाठी धमकीदेखील दिली होती.

काही दिवसांअगोदर कुणाल परत पॅरोलवर बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने २४ जानेवारी रोजी परत महिलेचे घर गाठले. त्याने परत तिच्यावर अत्याचार केला. तिची १४ वर्षी अल्पवयीन मुलगी घरी आली. तिच्यावरदेखील त्याने अत्याचार केला. महिलेने विरोध केला असता त्याने तिले मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर महिलेने हिंमत दाखवत जरीपटका पोलीस ठाणे गाठले व आपबिती पोलिसांसमोर मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी लगेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.

Web Title: After coming out on parole, Vasanandha was accused of murder, Aileki was tortured