बलात्कार करून फेसबुकफ्रेन्डने अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 21:21 IST2022-04-05T21:19:12+5:302022-04-05T21:21:51+5:30

Nagpur News पोलीस दलात नोकरी मिळणार असल्याची थाप मारून फेसबुकफ्रेन्डसोबत शरीरसंबंध जोडलेल्या युवकाने तिचे फोटो नातेवाईकांना पाठवून तिला ब्लॅकमेल केल्याची घटना घडली.

After being raped, a Facebook friend sent pornographic photos to relatives | बलात्कार करून फेसबुकफ्रेन्डने अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविले

बलात्कार करून फेसबुकफ्रेन्डने अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविले

ठळक मुद्देनांदेडच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखलपोलीस दलात असल्याची थाप

नागपूर : पोलीस दलात नियुक्ती मिळणार असल्याची थाप मारून नांदेड जिल्ह्यातील एका भामट्याने फेसबुक फ्रेन्डसोबत शरीरसंबंध जोडले. त्यानंतर अश्लील फोटो नातेवाईकांना पाठवून तिला ब्लॅकमेलही केले. सोपान बालाजी बासिंगे (२७) असे आरोपीचे नाव आहे.

सोपान नांदेड जिल्ह्यातील मुरकेवाडी (ता. लोहा) येथील रहिवासी आहे. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर त्याने कळमन्यातील २५ वर्षीय तरुणीशी सलगी वाढवली. आपली पोलीस दलात निवड होणार असून तुझ्याशी लग्न करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. जानेवारी महिन्यात तो तरुणीला भेटण्यासाठी नागपुरात आला. सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. तिचे न्यूड फोटो काढले. ते फोटो दाखवून तो तिला शरीरसंबंधासाठी बाध्य करू लागला. तिने विरोध केला असता त्याने तिच्या नातेवाईकाला तिचे अश्लील फोटो पाठविण्याची धमकी दिली. त्याच्या वर्तणुकीचा संशय आल्याने तिने त्याच्याबाबत चाैकशी केली असता तो पोलीसमध्ये नसल्याचे आणि त्याने फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. परिणामी ती त्याला टाळू लागली.

... अन् ती हादरली

ती टाळत असल्याने आरोपी सोपानने तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर तिचे न्यूड फोटो पाठविले. नातेवाईकांनी तरुणीकडे याबाबत विचारणा केल्यानंतर ती हादरली. नंतर तिने सोमवारी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार, विनयभंग तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी केली जात आहे.

----

Web Title: After being raped, a Facebook friend sent pornographic photos to relatives