शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गलग्रंथीच्या कर्करोगात प्रौढ महिलांचे प्रमाण अधिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:10 IST

गलग्रंथीचा कर्करोग हा पुरुष आणि तरुणांपेक्षा प्रौढ महिलेला अधिक प्रमाणात होतो. ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये गलग्रंथीचे विकार आढळत असतील तर त्यापैकी ६६ टक्के जणांना कर्करोग झाल्याचे आढळले आहे. या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत, अशी माहिती थायरॉईड म्हणजेच गलग्रंथीच्या कर्करोगावर आधारित चर्चासत्रात तज्ज्ञांनी दिली.

ठळक मुद्देथायरॉईड कर्करोग व ‘एन्डोक्राईन’ कर्करोगावर चर्चासत्र : राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गलग्रंथीचा कर्करोग हा पुरुष आणि तरुणांपेक्षा प्रौढ महिलेला अधिक प्रमाणात होतो. ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये गलग्रंथीचे विकार आढळत असतील तर त्यापैकी ६६ टक्के जणांना कर्करोग झाल्याचे आढळले आहे. या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत, अशी माहिती थायरॉईड म्हणजेच गलग्रंथीच्या कर्करोगावर आधारित चर्चासत्रात तज्ज्ञांनी दिली.‘कॅन्सर रिलीफ सोसायटी’द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने दोन दिवसीय थायरॉईड कर्करोग व ‘एन्डोक्राईन’ कर्करोगावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक क्रिपलानी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसचिव रणधीर झवेरी, प्रसिद्ध ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. मदन कापरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, मेडिकलच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक नितनवरे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. दासगुप्ता, सर्जन्स असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. राजेश सिंघानिया, हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा उपस्थित होते.चर्चासत्राची सुरुवात थायरॉईड कर्करोगावरील शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणाने झाली. डॉ. मदन कापरे व डॉ. अभिषेक वैद्य यांनी ही शस्त्रक्रिया करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून डॉ. अंजली कोल्हे व डॉ. हेमलता शिर्के यांनी सहकार्य केले.डॉ. गिरीश मोघे, डॉ. कापरे, डॉ. वैद्य, डॉ. अनिरुद्ध वाघ, डॉ. राज गजभिये, डॉ. सौरव विठाळकर, डॉ. प्रशांत ढोके, डॉ. सुधीर टोमे, डॉ. योगेश बंग, डॉ. राजेंद्र सावजी, डॉ. प्रशांत इंगळे, डॉ. शुभ्रजित दासगुप्ता, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. भाऊ राजूरकर व डॉ. मुकुंद ठाकूर यांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या वैज्ञानिक सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक नितनवरे, डॉ. बी.एस. गेडाम, डॉ. आशुतोष गावंडे, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. अब्दुल कुरेशी, डॉ. राजेश सिंघवी, डॉ. सुनील लांजेवार, डॉ. अंजली कोल्हे व डॉ. प्रदीप कटकवार होते.दोन दिवसीय चर्चासत्रात डॉ. सुशील लोहिया, डॉ. समीर ठाकरे, डॉ. डी. व्ही. डोईफोडे, डॉ. सरिता कोठारी, डॉ. हेमलता शिर्के, डॉ. प्रफुल्ल चहांदे, डॉ. अमोल हेडाऊ, डॉ. कर्तार सिंह, डॉ. यू. पी. पच्छेल उपस्थित होते. संचालन डॉ. मनीषा मिश्रा व डॉ. प्रियांका चौबे यांनी केले. आभार डॉ. बी. के. शर्मा यांनी मानले.

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटल