प्रशंसनीय! प्रामाणिकपणा ऑटो चालकाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 07:37 IST2021-05-28T07:37:17+5:302021-05-28T07:37:36+5:30

Nagpur News रस्त्यावर सापडलेली लॅपटॉप आणि बॅग पोलीस ठाण्यात आणून देत एका ऑटोचालकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला.

Admirable! Honesty of auto driver in Nagpur | प्रशंसनीय! प्रामाणिकपणा ऑटो चालकाचा

प्रशंसनीय! प्रामाणिकपणा ऑटो चालकाचा

नागपूर : रस्त्यावर सापडलेली लॅपटॉप आणि बॅग पोलीस ठाण्यात आणून देत एका ऑटोचालकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला.

राजू ताराचंद मडावी असे या ऑटोचालकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता मडावी यांना सेमिनरी हिल्स, व्हेटरनरी कॉलेजजवळील रस्त्यावर एक लॅपटॉप असलेली बॅग पडलेली दिसली. मडावी यांनी ही बॅग सीताबर्डी पोलीस ठाणे येथे आणून दिली. ही बॅग कविता प्रभाकर भुजाडे (२६, रा. चिटणीस गार्डन जवळ, दिघोरी) यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी भुजाडे यांना ती बॅग परत केली. तर ऑटोचालक मडावी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल ठाणेदार अतुल सबनीस यांनी त्यांना पुष्पगुच्छ, सॅनिटायझर , मास्क, आयुर्वेदिक काढा तसेच प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

---

Web Title: Admirable! Honesty of auto driver in Nagpur