शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

फाईलींमध्ये अडकला स्वातीचा 'वनशहीद' दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 12:42 IST

नागपूर : वन विभागात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला वन शहीद ठरविण्याचा प्रशासकीय घोळ अद्यापही कायमच आहे. ...

ठळक मुद्देप्रशासकीय घोळ कायमच

नागपूर : वन विभागात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला वन शहीद ठरविण्याचा प्रशासकीय घोळ अद्यापही कायमच आहे. वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्यावरील वाघाच्या हल्ल्यानंतर हा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहून व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्य व्याघ्र संवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलण्याची मागणी करून कर्तव्यावर मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वनशहिदांचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

स्वाती ढुमणे यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांनी भरीव मदतीची घोषणा करून पतीला वन विभागात नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र वन शहीद ठरविण्याची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. अपर प्रधान मुख्य वन संरक्षकांनी सप्टेंबर-२०२० मध्ये प्रधान सचिव (वने) महसूल व वनविभाग यांना पत्र पाठवून वनशहीद ठरविले जाण्याच्या प्रक्रियेसंदर्भात मागणी केली होती. पोलीस विभागात नक्षल कारवाईत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नुकसान भरपाईची तरतूद आहे. त्यानुसार, वारसांच्या नावे २५ लाखांची अनुदान मुदत ठेव दिली जाते. ती १० वर्षे काढता येत नाही. त्यावर व्याज मिळते.

महसूल व वन विभागाने २००८ मध्ये राज्याचे वन धोरण जाहीर केले. त्यातही वन संरक्षणाचे कार्य पार पाडताना अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास नातेवाइकाला पोलीस खात्याच्या पद्धतीनुसार नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत देण्याचा मुद्दा आहे. याचा आधार घेऊन अपर प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाने हे पत्र लिहिले होते. यापूर्वीही २०१६, १०१७ मध्ये मंजुरीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यात, वारसांना पोलीस विभागातील अटी शर्तीप्रमाणे २५ लाखाचे अनुदान, वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडताना अपंगत्व आल्यास पोलीस विभागाच्या २००५ मधील तरतुदीनुसार ३ लाखांची मदत तसेच गृह विभागाच्या २०११ मधील तरतुदीनुसार, कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास मृत्यूच्या वेळी देय असलेले अंतिम वेतन शहिदाच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीपर्यंत देणे तसेच, मृत नाही असे गृहीत धरून पदोन्नती आणि वेतनमान, तसेच अंतिम वेतन वार्षिक वेतनवाढीसह देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र यावर अद्यापही निर्णय नसल्याने स्वाती ढुमणे यांना वन शहीद ठरविण्याच्या मार्गात अडथळा दिसत आहे.

लगतच्या राज्यात कर्तव्यावर मृत्यू झाल्यास वनशहिदांचा दर्जा दिला जातो. राज्य शासनाकडून दरवर्षी वनशहीद दिनसुद्धा साजरा केला जातो. या घटनेनंतर आता तरी निर्णय अपेक्षित आहे. वनक्षेत्रात कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास वनशहिदाचा दर्जा देऊन परिवारास ५० लाख देण्याची तरतूद करावी.

- बंडू धोतरे, अध्यक्ष, इको प्रो संघटना.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलEmployeeकर्मचारीDeathमृत्यू