शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन, कर्मचारी आमने-सामने

By admin | Updated: February 6, 2015 00:58 IST

कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यावे, वेळेचे बंधन पाळावे या हेतूने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन्स लावण्यात आल्या.

बायोमॅट्रिक्स मशीनला विरोध : अपघातांचे प्रमाण वाढल्याची ओरडनागपूर : कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यावे, वेळेचे बंधन पाळावे या हेतूने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन्स लावण्यात आल्या. परंतु कार्यालयात घाईगडबडीत येताना कर्मचाऱ्यांचे अपघात होत असल्याचे कारण पुढे करून या मशीनला रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवणे सुरू केले असून बायोमॅट्रिक्सबाबत रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा वाद दिवसेंदिवस चिघळत आहे.रेल्वे कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर पूर्वी त्यांची नोंद एका रजिस्टरमध्ये होत होती. हे रजिस्टर सांभाळण्यासाठी एका कर्मचाऱ्यांला काम पाहावे लागत होते. परंतु बायोमॅट्रिक मशीनमुळे रेल्वे प्रशासनाच्या मनुष्यबळाची बचत होत आहे. जुलै २०१४ मध्ये रेल्वे प्रशासनाने ‘डीआरएम’ कार्यालयात ८ बायोमॅट्रिक मशीन तर रेल्वे रुग्णालयात दोन मशीन्स लावल्या. या मशीन्सला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने जोरदार विरोध केला. या मशीनमध्ये कर्मचारी कोणत्या वेळेला कार्यालयात हजर झाला याची नोंद होत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना ही मशीन डोकेदुखी ठरू लागली आहे. कार्यालयाने ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे सर्व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु तरीसुद्धा काही कर्मचारी या मशीनला विरोध करण्याचे काम करीत आहेत. कार्यालयात घाईगडबडीत येताना कर्मचाऱ्यांचे अपघात होत असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी योग्य वेळेवर घरून निघून सावकाश कार्यालयात पोहोचले तर अपघात टाळता येऊ शकतात, अशी रेल्वे प्रशासनाची भूमिका आहे. यामुळे भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)