वनविभागाच्या कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:02+5:302021-04-19T04:07:02+5:30
नागपूर : विदर्भातील वनविभागाच्या कर्मशाळेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचे आदेश वनविभागाने जारी केले आहेत. या कर्मचाऱ्यांसह आरागिरणी ...

वनविभागाच्या कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन
नागपूर : विदर्भातील वनविभागाच्या कर्मशाळेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचे आदेश वनविभागाने जारी केले आहेत. या कर्मचाऱ्यांसह आरागिरणी व आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचेही समायोजन करण्यात येणार असल्याचे आदेश विभागाने नुकतेच काढले.
वनविभागातील वाहनाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने कार्यशाळा सुरू केल्या. विदर्भात धारणी, परतवाडा, आकोट, नवेगावबांध, गडेगाव, बल्लारपूर, आल्लापल्ली आणि सिरोंचा येथे कार्यशाळा आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत या कार्यशाळेत काम मिळणे बंद झाल्याने या कार्यशाळा पांढरा हत्ती ठरल्या आहेत. विविध कर्मशाळांच्या ५०च्यावर कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे त्यांच्या आस्थापनेवर गत दहा वर्षांपासून करोडो रुपये खर्च झालेत. लाेकमतने पाच-दहा वर्षांचा तपशील घेऊन वृत्त प्रकाशित केले हाेते. करोडो रुपयांचा होणारा अवास्तव खर्च वाचविणे तसेच त्यांचे समायोजनाची भूमिका घेत वनविभागाला आवाहन केले. याप्रकरणी कामगार व शेतकरी नेते राजानंद कावळे यांनी मुख्यमंत्री आणि वनमंत्री व मुख्य वनबल प्रमुखांसह अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. या प्रकरणाची दखल घेत शासनाने या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासंदर्भात नुकताच आदेश काढला आहे.
दरम्यान वनविभागाने अंतर्गत आरागिरणी तसेच आराेग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचेही समायाेजन करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत प्रत्येक केंद्राला वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.