अस्वच्छता पसरविणाऱ्या १३१ लोकांवर कारवाई
By मंगेश व्यवहारे | Updated: May 6, 2024 19:07 IST2024-05-06T19:06:17+5:302024-05-06T19:07:05+5:30
Nagpur : ७० हजाराचा दंड वसूल

Action taken against 131 people spreading uncleanliness
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारे, कचरा फेकणारे, रस्त्यावर थुंकणारे याशिवाय अन्य उपद्रव घटकातील १३१ लोकांवर महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाने कारवाई करून ७०,७०० रुपये दंड वसूल केला आहे.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात कचरा फेकल्या प्रकरणी ५० लोकांवर कारवाई केली आहे. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्यामुळे ११ लोकांवर कारवाई केली आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज उभारून बंद करणाऱ्या १० लोकांवर कारवाई केली आहे. बांधकामाचा मलबा रस्त्यावर टाकल्या प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अन्य उपद्रव घटकात ३६ लोकांवर कारवाई केली आहे. प्रतिबंधात्मक प्लास्टीक पिशवी वापरणाऱ्या ३ लोकांवर कारवाई केली आहे.