शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

पाणीटंचाई निवारणासाठी ९१.४९ कोटी रुपयांचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 10:03 PM

नागपूर विभागात ३ हजार ८६५ गांवे व १९२ वाड्यात पाणी टंचाई आराखड्यांतर्गत तीन टप्प्यात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या व जुलै अखेरपर्यंत टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी ७ हजार ७४६ जिल्हानिहाय उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून या उपाययोजनांवर ९१ कोटी ४९ लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागातील ३,८६५ गावांसाठी ७,७४६ उपाययोजना :आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात ३ हजार ८६५ गांवे व १९२ वाड्यात पाणी टंचाई आराखड्यांतर्गत तीन टप्प्यात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या व जुलै अखेरपर्यंत टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी ७ हजार ७४६ जिल्हानिहाय उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून या उपाययोजनांवर ९१ कोटी ४९ लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या विभागातील गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून सर्वाधिक टंचाई असलेल्या नागपूर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील १५५ गावातील १८० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहे.पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत नवीन विंधन विहिंरीवर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरद्वारे अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी नऊ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावरुन तातडीने अंमलबजावणी करावयाच्या १ हजार ९९१ गावातील २ हजार ६४४ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ८४० गावातील १ हजार ०१५ उपाययोजना प्रगतिपथावर असून २५६ गावातील ४९२ उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी दिली.दुष्काळाची तीव्रता असलेल्या गावांमध्ये विभागातील गंभीर व मध्यम स्वरुपाच्या तालुक्यांमध्ये १० तालुक्यांचा समावेश असून काटोल, कळमेश्वर हे तालुके गंभीर स्वरुपात तर नरखेड, आष्टी, कारंजा, ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा व सिंदेवाही या सात तालुक्यांचा समावेश आहे. तसेच ४५ मंडळामध्ये दुष्काळ घोषित करुन सवलती लागू केल्या आहेत. पुढील दोन महिने पिण्याच्या पाण्याची तीव्रता लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात ११६, वर्धा ५० व चंद्रपूर जिल्ह्यात ५ टँकर लावण्याची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना स्थानिकस्तरावर ग्रामपंचायतीमार्फत पाणी निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी यांनी ग्रामस्तरावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या प्रकल्पामधून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे. तसेच भंडारा जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पातून, लाखांदूर तालुक्यातून २९ गावांसाठी ४ दलघमी व बावनथडी प्रकल्पातून तुमसर तालुक्यातील १३ गावांसाठी ३ दलघमी पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात यावे. पाणीटंचाई असलेल्या सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची खंडित वीज जोडण्या पूर्ववत करणे तसेच पाणीटंचाई कालावधीत पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यात यावीत. निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याप्रमाणे पाणीपुरवठा विभागातर्फे तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfundsनिधी