शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

मीरा वाईन्स शॉप व हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बारवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 10:18 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मीरा वाईन शॉप आणि हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बार येथे अचानक भेट देऊन दोन्ही ठिकाणी अटी व नियमांचा भंग होत असल्याचे आढळून आल्यानंतर विभागीय गुन्हा नोंदविला आहे. लोकमतने ‘वाईन शॉपच करून देतात पिण्याची सोय’ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभाग : अटी व नियमांचा भंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मीरा वाईन शॉप आणि हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बार येथे अचानक भेट देऊन दोन्ही ठिकाणी अटी व नियमांचा भंग होत असल्याचे आढळून आल्यानंतर विभागीय गुन्हा नोंदविला आहे.  लोकमतने  ‘वाईन शॉपच करून देतात पिण्याची सोय’ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.या वृत्ताने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत दुपारीच दोन्ही दुकानांची प्रत्यक्ष पाहणी केली. वृत्तातील सत्यस्थिती त्यांना दिसून आली. तसेच एप्रिल महिन्यात शहरात नियमांचा भंग करणाऱ्या व जादा दराने मद्य व बीअर विकणाऱ्या २० लायसन्सीवर विभागीय गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सर्व प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा घेऊन सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्यात शहरात सर्वच बीअर शॉपीमध्ये ‘चिल्ड’ या नावाखाली बीअर आणि वाईन्स शॉपीमध्ये मद्य एमआरपी किमतीपेक्षा जास्त दर आकारून विकण्यात येत असल्याच्या तक्रारी अनेकांनी लोकमतकडे केल्या असून या सर्व दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीnagpurनागपूर