लोकमत न्यूज् नेटवर्क
नागपूर : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. सोमवारी दोन झोनमध्ये केलेल्या तीन कारवाईच्या माध्यमातून ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहेत. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. हनुमाननगर झोनअंतर्गत दोन व आशीनगर झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आली. या माध्यमातून तीन हजारांचा दंड वसूल केला. ४५ प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले.