शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

८ मंगल कार्यालयांवर कारवाई, ३७ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:11 IST

नागपूर : मंगल कार्यालय, लॉन, सभागृहात आयोजित कार्यक्रमांना हजारोंची गर्दी होत असून, ही ठिकाणे आता कोरोनाचे हॉटस्पॉट ...

नागपूर : मंगल कार्यालय, लॉन, सभागृहात आयोजित कार्यक्रमांना हजारोंची गर्दी होत असून, ही ठिकाणे आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागली आहेत. मंगळवारी अशा ८ सभागृहांवर कारवाई करून ३२ हजारांचा दंड आकारण्यात आला. अशा स्वरूपाची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

शोध पथकांनी मंगळवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील चार मंगल कार्यालये, धरमपेठ झोनमध्ये दोन, नेहरूनगर झोन व सतरंजीपुरा झोनमध्ये प्रत्येकी एका मंगल कार्यालयावर कारवाई करून दंड आकारण्यात आला.

लक्ष्मीनगर झोनचे उपद्रव शोध पथकाचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनमध्ये धर्मराज कटरे, नेहरूनगर झोनमध्ये नत्थू खांडेकर, सतरंजीपुरा झोनमध्ये प्रेमदास तरवटकर यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. या झोनमधील पराते सभागृह, राधे मंगलम सभागृह, गोल्डन लीफ लॉन, साईबाबा सभागृह येथे २०० हून अधिक नागरिक विवाह सभारंभात आढळून आले. त्यांना प्रत्येकी ५ हजार दंड आकारण्यात आला.

धरमपेठ झोनमधील कुसुमताई वानखेडे सभागृह, नेहरूनगर झोनमधील जट्टेवार मंगल कार्यालय व सतरंजीपुरा झोनमधील प्रीतम सभागृहाला दंड आकारण्यात आला. धरमपेठ झोन क्षेत्रातील रामदासपेठ येथील मातृ मंगल कार्यालयात गर्दी नव्हती; परंतु सॅनिटायझर नसल्याने २ हजारांचा दंड आकारण्यात आला.

हॉटस्पॉट भागात स्क्रिनिंग सुरू

- शहरात कोविडचे नवीन ९ हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. यात खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बिडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर आदींचा समावेश आहे. या परिसरात मनपातर्फे तपासणी व स्क्रिनिंग सुरू करण्यात आली आहे.

दुकानदारावरही होणार कारवाई

- मंगल कार्यालयानंतर मनपा बाजारात होणारी गर्दी नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी नियोजन केले आहे. दुकानात सुरक्षित अंतर व मास्कचा वापर न केल्यास दंड आकारला जाणार आहे, तसेच सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी झोन स्तरावर जबाबदारी दिली जात आहे. लवकरच कारवाई केली जाणार आहे. मनपा आयुक्तांनी व्यापाऱ्यांना अ‍ॅक्शन प्लान मागतिला होता.