तरुणाला मारहाण करून अडीच तोळ्याची चेन पळविणारे आरोपी अटकेत

By योगेश पांडे | Updated: May 9, 2023 16:55 IST2023-05-09T16:54:39+5:302023-05-09T16:55:20+5:30

Nagpur News एका तरुणाला मध्यरात्री मारहाण करून त्याची अडीच तोळ्यांची सोन्याची चेन पळविणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

Accused who beat a young man and stole two and a half tola chain, arrested | तरुणाला मारहाण करून अडीच तोळ्याची चेन पळविणारे आरोपी अटकेत

तरुणाला मारहाण करून अडीच तोळ्याची चेन पळविणारे आरोपी अटकेत

योगेश पांडे 
नागपूर : एका तरुणाला मध्यरात्री मारहाण करून त्याची अडीच तोळ्यांची सोन्याची चेन पळविणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

सोमवारी मध्यरात्रीनंतर आकाश नंदकिशोर शुक्ला (३१, बजेरिया) हा तरुण त्याच्या मित्रांसोबत धोंडबा चौकात बोलत बसला होता. त्याचवेळी राजा बल्ला उर्फ राज काल्या फैजान खान उर्फ राशीद खान (२७, मिर्जा गल्ली, हंसापुरी), नमन राजु गौर (२५, ओमनगर) व नाझीम कुरैशी (३६, कसाईपुरा, धोंडबा चौक) हे तेथे पोहोचले. ते आकाशजवळ आले आणि तू एमडी पावडर विकतोस व आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे बोलायला लागले. आकाशने मी असे काहीच करत नाही म्हणत पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चेन व रोख असे १ लाख ७०० रुपये घेऊन पळ काढला. आकाशने लगेच तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला. राजा बल्ला व नमन गौर हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तिसरा साथीदार नाझीम अद्यापही फरार आहे.

Web Title: Accused who beat a young man and stole two and a half tola chain, arrested