एमडी पावडरसह आरोपीला केले गजाआड
By दयानंद पाईकराव | Updated: July 13, 2024 16:05 IST2024-07-13T16:03:59+5:302024-07-13T16:05:39+5:30
७९ हजारांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी

Accused was arrested with MD powder
दयानंद पाईकराव
नागपूर : एमडी पावडर बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने शुक्रवारी १२ जुलैला सायंकाळी ५ ते ७ वाजताच्या दरम्यान अटक करून त्याच्या ताब्यातून ७९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हासीम राशीद शेख (२२, रा. गरोबा मैदान, माटे चौक, लकडगंज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक शुक्रवारी १२ जुलैला लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गरोबा मेदानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्यावर संशय आल्यामुळे त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ५ ग्रॅम ८३० मिलीग्रॅम एमडी पावडर, मोबाईल व रोख ११२० रुपये असा एकुण ७९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्याने आपला साथीदार गोलु बोरकर (रा. नंदनवन) याच्या मदतीने अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करीत असल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध कलम ८ (क), २२ (ब), २९ एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यास लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.