भागीदारावर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 01:08 IST2021-01-29T01:07:58+5:302021-01-29T01:08:56+5:30

Rape, crime news तीन-चार वर्षांपासून भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या मित्राने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने वाठोडा पोलिसांकडे नोंदविली.

Accused of raping partner | भागीदारावर बलात्काराचा आरोप

भागीदारावर बलात्काराचा आरोप

 लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : तीन-चार वर्षांपासून भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या मित्राने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने वाठोडा पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात ताैसिफ (वय ३४) नामक इसमावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तक्रार करणारी महिला ३० वर्षांची असून, तिला दोन मुली आहेत. ताैसिफ तिचा जुना मित्र आहे. नवऱ्याशी पटत नसल्याने ती दोन वर्षांपूर्वी ताैसिफकडे आली. या दोघांनी भागीदारीत पीओपीच्या साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या ना त्या कारणाने तौसिफ नेहमीच त्या महिलेच्या वाठोड्यातील घरी जात होता. २४ जानेवारीला तो घरी आला आणि त्याने बलात्कार केला. नंतर जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार त्याच्या मैत्रिणीने गुरुवारी पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Accused of raping partner