घरफोडीच्या आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक, ३.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By योगेश पांडे | Updated: July 10, 2023 17:26 IST2023-07-10T17:25:12+5:302023-07-10T17:26:21+5:30
बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घरफोडीच्या आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक, ३.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
११ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत रविरोशन भोला कुर्वे (३४, कृष्णकृपा ले आऊट, पांजरी फार्म) हे बाहेरगावी गेले असता अज्ञात आरोपींनी घराच्या स्वयंपाकघराचे दार तोडून आत प्रवेश केला व ४.३३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. कुर्वे यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाकडूनदेखील याचा तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांना यात निलेश सुनवा हरदिया (२४, खापरी पुनर्वसन वस्ती) व कृष्णा तिवदुजी पंचेश्वर (२८, श्रमिक नगर, परसोडी) हे सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून रोख २.८० लाख, सोन्याची अंगठी, चेन, दुचाकी असा ३.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, राजेंद्र गुप्ता, दीपक ठाकरे, बबन राऊत, नूतनसिंह छाडी, नितीन वासनिक, सुशांत सोळंके, रितेश तुमडाम, सोनू भावरे, मनोज टेकाम, हेमंत लोणारे, सुनित गुजर, शरद चांभारे, अजय शुक्ला, अमर रोठे, चंद्रशेखर भारती, योगेश सेलूकर, नितीन बोपुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.