शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यातील आरोपी पुराव्यांशी छेडछाड करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:14 IST

सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, आरोपींना जामीन देण्यास जोरदार विरोध केला आहे. यासंदर्भात सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारला भीती : जामीन देण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, आरोपींना जामीन देण्यास जोरदार विरोध केला आहे. यासंदर्भात सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.आरोपींमध्ये कंत्राटदार आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या संयुक्त उपक्रम कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, मुखत्यारपत्रधारक रमेशकुमार सोनी व गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जीभकाटे यांचा समावेश आहे. यांच्यासह इतर आरोपींनी संगनमत करून गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या  मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा बांधकाम निविदा वाटपात गैरव्यवहार केला, असे सरकारचे म्हणणे आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात एकूण १२ आरोपींविरुद्ध ४,५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली नाही. संयुक्त उपक्रम कंपनीला फायदा होईल, अशी कृती करण्यात आली. जबाबदारीच्या पैलूकडे दुर्लक्ष करून २००९ मध्ये कंपनीला कार्यादेश जारी करण्यात आला. संयुक्त उपक्रम कंपनीच्या नोंदणीची कागदपत्रे व भागीदारीचा करार उपलब्ध नाही. कंपनीने हे कंत्राट मिळविण्यासाठी त्यांच्याकडील दगडपारवा प्रकल्पाची माहिती लपवून ठेवली होती. त्यांनी गोपनीयता व पारदर्शी स्पर्धेच्या तत्त्वाची पायमल्ली केली. कंपनीकडे निकषानुसार अनुभव प्रमाणपत्र नाही. त्यामुळे आरोपींविरु द्ध एफआयआर नोंदविण्यात आला, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.पुढील सुनावणी १२ मार्चलान्यायालयाने सोमवारी सरकारचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रकरणावर १२ मार्च रोजी सुनावणी निश्चित केली. तसेच, आरोपींवर कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचा अंतरिम आदेश पुढील तारखेपर्यंत कायम ठेवला. आरोपींतर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, अ‍ॅड. आर. एस. सुंदरम, अ‍ॅड. उषा तन्ना, अ‍ॅड. सुमित जोशी तर, सरकारतर्फे अ‍ॅड. विनोद ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पCorruptionभ्रष्टाचार