शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

फायनान्स कंपनीचा आरोपी संचालक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:24 IST

नऊ वर्षांपूर्वी फायनान्स कंपनी उघडून नागपूर, विदर्भातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा आरोपी कृष्णा बळीराम पटले याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने आज यश मिळवले.

ठळक मुद्देभंडाऱ्यात केली अटक : गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नऊ वर्षांपूर्वी फायनान्स कंपनी उघडून नागपूर, विदर्भातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा आरोपी कृष्णा बळीराम पटले याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने आज यश मिळवले.आरोपी पटले तसेच अभिराम तमंग, संजय चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी हिवरीनगरातील वैष्णवदेवी चौकात धनलक्ष्मी इन्फ्रा ग्रुप ऑफ कंपनीज नावाने कार्यालय थाटले होते. नंतर त्यांनी धनलक्ष्मी इन्फ्रा अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो इंडिया लिमिटेड नावाने रक्कम गोळा करण्याचा व्यवसाय सुरू केला. कंपनीत रक्कम गुंतविल्यास बँकपेक्षा जास्त व्याज आणि तातडीने अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचे आमिष उपरोक्त आरोपी दाखवत होते. त्यासाठी त्यांनी अनेक एजंट नेमले होते. त्यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडून नागपूर विदर्भासह ठिकठिकाणच्या शेकडो गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे आपली आयुष्याची जमापुंजी गुंतवली होती. ३० डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीसाठी यशवंत फत्तुजी राहाटे यांनीही एक लाख रुपये गुंतवले होते. मुदत संपल्यानंतर राहटे आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या व्यक्तींनी आपली रक्कम परत मागणे सुरू केले असता आरोपींनी कंपनीचे ऑफिस बंद करून तिथून पळ काढला. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपींचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील होते. आरोपी पटले हा तुमसर (जिल्हा भंडारा) येथे लपून असल्याची माहिती कळताच पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक भीमा नरके, उपनिरीक्षक सुरेश वानखेडे, शिरसाट, हवालदार संजय सोनवणे आणि शिपाई ज्वाला मेश्राम यांनी तुमसर येथे जाऊन आरोपी पटेल यांच्या मुसक्या बांधल्या. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करून त्याचा ७ ऑगस्ट पर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.पुढे या, तक्रारी द्या !या कंपनीत गुंतवणूक करून ज्यांची फसवणूक झाली. त्यांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्या, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Arrestअटकfraudधोकेबाजी